24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामानेरुळ येथे बांधकाम व्यावसायिकाला गोळ्या घालणारे सापडले बिहारमध्ये

नेरुळ येथे बांधकाम व्यावसायिकाला गोळ्या घालणारे सापडले बिहारमध्ये

हत्येसाठी वापरलेली मोटारसायकल सापडली आणि आरोपी पकडले गेले

Google News Follow

Related

नेरुळ येथे सेक्टर क्र. जवळ अपना बाजार मार्केटच्या समोर बांधकाम व्यावसायिक सवजीभाई मंजेरी यांची दोन अज्ञात इसमांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली होती. त्याचा छडा आता लागला आहे.

ही घटना पोलिसांच्या दृष्टीने आव्हानात्मक होती. त्यासाठी मग पोलिस उपायुक्त परिमंडळ १ व पोलिस उपायुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली. अज्ञात इसमांनी मोटारसायकलवर येऊन गोळ्या झाडल्या होत्या. त्या मोटारसायकलचा शोध घेतल्यावर आरोपी मेहेक नारिया (२८) राजकोट, गुजरात येथे असल्याचे कळले.

हे ही वाचा:

जपानी पंतप्रधान किशिदा आणि नरेंद्र मोदी यांच्यात रंगल्या ‘गोलगप्पा’ मग कुल्हडमधील चहा

कुठे गायब झालाय खलिस्तानी समर्थक अमृतपाल?

रवींद्र वायकर सुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?

ठाण्यात बांधणार बागेश्वर धामचे मोठे मंदिर

त्याच्याकडून माहिती घेण्यात आल्यानंतर हे स्पष्ट झाले की, ज्या मंजेरी याची हत्या झाली त्याने १९९८मध्ये गुजरात येथे बचूभाई पटणी यांचा खून केला होता. त्यामुळे त्याने मुंबईतील लोकांच्या मदतीने हत्या करणाऱ्याचा खून करण्याची योजना आखण्यात आली. त्यासाठी बिहारमधून तीनजणांना बोलावण्यात आले. नंतर मंजेरी यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली आणि मग मंजेरीला एकटे गाठून त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यासंदर्भात आता मेहेक नारिया, कौशल कुमार विजेंद्र यादव, गौरवकुमार विकास यादव, सोनूकुमार विजेंद्र यादव यांना अटक करण्यात आली आहे. इतरांचा शोध सुरू आहे. नारिया वगळता बाकी आरोपी हे बिहारमध्ये सापडले.

ही कारवाई मिलिंद भारंबे (पो. आयुक्त), संजय मोहिते (पो. सहआयुक्त), महेश घुर्ये (अप्पर पोलिस आयुक्त), विवेक पानसरे, गजानन राठोड, तानाजी भगत, रवींद्र दौंडकर, महेश पाटील, सचिन ढगे यांनी प्रयत्न करून गुन्हेगारांना जेरबंद केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा