ऑस्ट्रेलियामध्ये तरुणीचा खून; भारतात लपलेल्या राजविंदर सिंगला अटक

आणि तो ऑस्ट्रेलियामध्ये हत्या करून भारतात पळाला ; ४ वर्षानी पकडला

ऑस्ट्रेलियामध्ये तरुणीचा खून; भारतात लपलेल्या राजविंदर सिंगला अटक

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला मोठे यश मिळाले आहे. तब्बल ४ वर्षानंतर एका आरोपीला जेरबंद करण्यात यश आहे. या आरोपीने २०१८ मध्ये, ऑस्ट्रेलियात एका मुलीच्या हत्येप्रकरणी, १ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे बक्षीस असलेला राजविंदर सिंग याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. राजविंदर सिंग (३८) हा मूळचा पंजाबमधील बट्टर कलानचा असून, त्याच्यावर २०१८ मध्ये २४ वर्षीय टोया कॉर्डिंगलीची हत्या केल्याचा आरोप आहे.

राजविंदर सिंग ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होता. ऑक्टोबर २०१८ मध्ये क्वीन्सलँडच्या समुद्रकिनाऱ्यावर टोया नावाच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. क्वीन्सलँड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फार्मसीमध्ये काम करणारी टोया कार्डिंगले क्वीन्सलँडमधील वांगेटी बीचवर तिच्या श्वानाला फिरवत होती. त्याच दरम्यान तिची हत्या करण्यात आली. राजविंदर सिंगवर या मुलीचा हत्येचा आरोप आहे. टोयाच्या हत्येनंतर दोन दिवसांनी राजविंदर भारतात पळून गेला आणि तेव्हापासून तो येथेच लपून राहिला होता. ऑस्ट्रेलियन पोलीस बऱ्याच दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. राजविंदर सिंगची माहिती दिल्यावर ऑस्ट्रेलियन प्रशासनाने १० लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे ५० मिलियनचे इनाम जाहीर केले होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाकडून प्रत्यार्पणासाठी अपील करण्यात आले होते. भारत सरकारने गेल्या महिन्यात ते मान्य केले होते.

हे ही वाचा:


आरेमध्ये एका महिलेचा अपघातात जागीच मृत्यू

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सावरकरांनी अंदमानमध्ये यातना भोगल्या…

आव्हाडांना भीती सीबीआयच्या तपासाचा ससेमिरा मागे लागण्याची

आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात

टोयाच्या हत्येनंतर राजविंदर सिंग २३ ऑक्टोबर २०१८ रोजी आपली पत्नी, तीन मुले आणि ऑस्ट्रेलियात नोकरी सोडून भारतात पळून गेला होता. पोलिसांनी त्याच्या शोधात काही फोटो प्रसिद्ध केले. राजविंदर अमृतसर विमानतळावर उतरला होता आणि काही कारणांमुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. असे त्याच्या भावाने आधी सांगितले होते. मात्र, त्यानंतर त्याच्याबद्दल फारशी माहिती मिळू शकली नव्हती.

Exit mobile version