‘त्या’ कुटुंबाची आत्महत्या नसून हत्या

‘त्या’ कुटुंबाची आत्महत्या नसून हत्या

आठ दिवसांपूर्वी सांगलीमधील मिरज येथील म्हैसाळच्या एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. मात्र, तपासात अशी माहिती समोर आली आहे की, ही आत्महत्या नसून, हत्या आहे.

रविवारी, १९ जून रोजी विष प्राशन करून दोन भावांच्या कुटुंबियांनी आत्महत्या केल्याचा माहिती समोर आली होती. कर्जबाजारी झाल्याने या कुटुंबाने आत्महत्या केली होती अशी माहिती त्यावेळी समोर आली होती. मात्र आता या नऊ जणांची जेवणात विषारी पदार्थ मिसळून हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अब्बास महंद बागवान आणि धीर चंद्रकांत सरवशे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे हे दोन भाऊ कुटुंबासोबत राहत होते. माणिक वनमोरे हे पशुवैद्य असल्याने त्यांची मिळकत चांगली होती. दोघे भाऊ गेल्या पाच वर्षांपसून मांत्रिकाच्या आहारी गेले होते. मांत्रिकांनी त्यांना गुप्तधनाचे आमिष दाखवले. पैशाच्या लालसाला बळी पडून हे दोन भाऊ मांत्रिकांना पैसे देत गेले. मग कुटुंबात पैशाची कमी भासू लागल्यांनंतर कर्ज घेणे, नातेवाइकांकडून पैसे घेणे, यामुळे ते भाऊ कर्जबाजारी झाले.

हे ही वाचा:

शापूरजी पालनजी उद्योगसमुहाचे प्रमुख पद्मभूषण पालनजी मिस्त्री यांचे निधन

२२ जून ते २४ जून कालावधीत मंजूर प्रस्तावांचा तपशील देण्याचे माविआला आदेश

अग्निपथ योजनेला ‘वायू’गतीने अर्ज; ९४ हजार युवक इच्छुक

धक्कादायक!! अमेरिकेत ट्रकमध्ये सापडले ४६ मृतदेह

वनमोरे बंधू नेहमी पैश्यांच्या व्यवहारासाठी एका अनोळखी व्यक्तीला भेटत असत, असे गावकऱ्यांनी माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता, घटनेच्या वेळी सुद्धा दोन व्यक्ती त्यांच्या घरी आले होते, अशी माहिती समोर आली. ते दोघ १९ जूनला वनमोरे यांच्या घरी गेले होते आणि त्यांनीच त्या कुटुंबाच्या जेवणात विष टाकले, चौकशीत या दोघांनी कबुली दिली आहे.

Exit mobile version