पोलिस उपायुक्ताच्या मुलाची हत्या मामेभावाने मालमत्तेसाठी केली!

माजी पोलिस उपायुक्त वसंत कांबळे यांचा मुलगा विशाल कांबळे याचा कुजलेला मृतदेह सापडला होता

पोलिस उपायुक्ताच्या मुलाची हत्या मामेभावाने मालमत्तेसाठी केली!

चेंबूर येथून अपहरण केलेल्या ४४ वर्षीय विशाल कांबळेचा कुजलेला मृतदेह दुसऱ्याच दिवशी वडोदरा महामार्गालगत सापडला. मालमत्तेच्या वादातून विशालची हत्या त्याचा मामेभाऊ आणि मुख्य आरोपी प्रणव प्रदीप रामटेके (२५) याने केल्याचे तपासात उघड झाले आहे. विशाल हा माजी पोलिस उपायुक्त वसंत कांबळे यांचा मुलगा आहे.

विशाल आणि त्याची आई रोहिणी यांचे चेंबूर येथील हॉटेलमधून अपहरण करण्यात आले होते. संशयितांनी विशालला गुंगीचे औषध पाजून पनवेलमधील एका व्हिलामध्ये मारून टाकले. त्यानंतर त्याचा मृतदेह अहमदाबादला नेण्यात आला. तर, आरे कॉलनीतून रोहिणीची सुटका करण्यात आली. चेंबूर पोलिसांनी बुधवारी प्रणव रामटेके आणि त्याचे चार साथीदार ज्योती सुरेश वाघमारे (३३), तिचा पती रोहित अनिल उडाणे उर्फ मुसा पारकर (४०) आणि मुनीर अमीन पठाण (४१) आणि राजू बाबू दरवेश यांना अटक केली. पोलिस या प्रकरणी एका महिलेसह आणखी दोघांचा शोध घेत आहेत.

माजी पोलिस उपायुक्त वसंत कांबळे यांचा मुलगा विशाल कांबळे याचा कुजलेला मृतदेह चेंबूर पोलिसांना तसेच गुजरातमधील नंदेसरी पोलिसांना मुंबई-वडोदरा महामार्गापासून सात किमी अंतरावर सापडला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. डॉक्टरांच्या अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. विशालचा मृतदेह ज्या गाडीतून नेण्यात आला होता, त्या गाडीचा अद्याप शोध लागलेला नाही. विशाल शारीरिकदृष्ट्या मजबूत असल्याने तो स्वतःची सुटका करून त्यांच्यावर हल्ला करेल, अशी भीती आरोपींना होती, असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

एक पटकथा, दोन भाकीतं आणि तीन विकेट

‘मी पुन्हा येईन’, असं न सांगता पवार पुन्हा आले…

दिवे गेलेले असताना राष्ट्रपतींवर प्रकाशझोत ठेवणे धोक्याचे होते! असे काय घडले?

‘अजित पवारांचं वागण बघूनचं शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला’

रोहिणी कांबळे आणि त्यांचा भाऊ प्रदीप यांचा मुलगा प्रणव यांच्यात कोल्हापुरातील पाच एकर शेतीचा भूखंड आणि कोट्यवधी रुपयांचा मोठा बंगला यावरून मालमत्तेचा वाद सुरू होता. या प्रकरणी नगर न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यातूनच ही हत्या झाल्याचे समजते.

Exit mobile version