वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची हत्या

वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची हत्या

वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची कर्नाटकातील हुबळी येथे हत्या करण्यात आली आहे. हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये त्यांची चाकूने हत्या करण्यात आली आहे. अचानक झालेल्या त्यांच्या हत्येने खळबळ उडाली असून, त्यांची हत्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे सांगितले जात आहे.

हुबळीतील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये चंद्रशेखर अंगाडी उर्फ चंद्रशेखर गुरुजी होते. त्यावेळी त्यांची भक्त्यांच्या वेशात असलेल्या मारेकऱ्यांनी मंगळवार,५ जुलै रोजी म्हणजेच आज त्यांची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर गुरुजींचे पार्थिव KIMS रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हॉटेलच्या रिसेप्शन काउंटरवर त्यांची हत्या करण्यात आली. दोन हल्लेखोरांनी चंद्रशेखर यांच्यावर चाकूने वार करुन तेथून पळ काढल्याची घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हॉटेलमधील कर्मचार्‍यांनी सांगितले की, गुरुजी २ जुलै रोजी हॉटेलमध्ये आले होते आणि त्यांना ६ जुलै रोजी इथून जायचे होते. हल्लेखोर बागलकोट येथील असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. त्यांच्या हत्येने कर्नाटकात खळबळ उडाली आहे. परंतु गुरुजींची हत्या कोणत्या कारणामुळे झाली याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

हे ही वाचा:

डबघाईला आलेल्या पाकव्याप्त काश्मीर सरकारने खरेदी केल्या आलिशान गाड्या

नुपूर शर्मांवर संतप्त झालेल्या न्यायाधीशांविरोधात माजी न्यायाधीश, आयएएस अधिकारी

मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी; रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका

‘लक्ष्य ऑलम्पिक मिशन’ सदस्य समितीमध्ये आमदार आशिष शेलार यांची नियुक्ती

कर्नाटकातील एक प्रसिद्ध नाव असलेले चंद्रशेखर गुरुजी सरला वास्तूवर टीव्ही कार्यक्रम करत होते. चंद्रशेखर गुरुजी दोन हजाराहून अधिक चर्चासत्रांमध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यांना सोळा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ते सिव्हिल इंजिनिअर होते. तसेच त्यांनी आर्किटेक्चरमध्ये डॉक्टरेट मिळवली होती.

Exit mobile version