28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाउल्हासनगर कायदा-सुव्यवस्थेच्या नावाने उल्हास...घडली आणखी एक घटना!

उल्हासनगर कायदा-सुव्यवस्थेच्या नावाने उल्हास…घडली आणखी एक घटना!

Google News Follow

Related

आठवडाभरात दोन अल्पवयीन मुलींच्या बलात्काराच्या घटनेने हादरलेल्या उल्हासनगरमध्ये शुक्रवारी (१७ सप्टेंबर) सुशांत गायकवाड तरुणाची भररस्त्यात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला २४ तास उलटत नाहीत तोच शुक्रवारी रात्री उशिरा रमाबाई डॉ. आंबेडकर नगर परिसरात ज्ञानेश्वर सोनावणे या तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि हत्या यांचे सत्र सुरू असून कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुभाष टेकडी कानसई रोडवरील सोंग्यांच्या वाडीत लालचक्की येथील ज्ञानेश्वर सोनावणे (२५) या तरुणाचा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी सूरज शिंदे उर्फ शिवड्या (२०) याला अटक केली आहे. मृत ज्ञानेश्वर आणि आरोपी सूरज हे दोघे मित्र होते. शुक्रवारी रात्री ते दोघेही दारू पित होते. त्यावेळी सूरजने ज्ञानेश्वरचा मोबाईल घेतल्यावरून त्या दोघांमध्ये बाचाबाची झाल्याने सूरजने ज्ञानेश्वरवर चाकूने हल्ला केला.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानमध्ये तालिबानांनी बंद केले महिलांना मंत्रालयाचे दरवाजे

आज उघडणार मराठी बिग बॉसच्या घराचे दार

…या चित्रपटाला ‘अवकाश’ आहे!

लग्नाला नकार दिला म्हणून केले तरुणीच्या भावाचे अपहरण!

पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त डी. डी. टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, उपनिरीक्षक हर्षल राजपूत यांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या मदतीने आरोपी सूरज याला अटक केली. ज्ञानेश्वर याच्यावर हल्ला केल्याची कबुली सूरजने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही महिना उलटला, तरी आरोपींना अटक झालेली नाही. कॅम्प नंबर पाच परिसरात शुक्रवारी सहा वर्षांच्या भाचीवर मामाने बलात्कार केल्याची घटना उघड झाली होती. या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून सदर इसमास अटक करण्यात आली आणि न्यायालयापुढे हजर करण्यात आले. सुशांत गायकवाडच्या हत्येच्या घटनेनंतर विठ्ठलवाडी आणि हिललाईन पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये पाच आरोपींना अटक केली. गेल्या काही वर्षात ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ चारच्या हद्दीत मोडणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर आणि विशेषतः उल्हासनगर या शहरात गुन्हेगारीचा आलेख सातत्याने चढा आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा