दारूसाठी पाच रुपये कमी दिल्याने दुकानदाराने केलेल्या मारहाणीत एकाच मृत्यू !

दुकानदार आणि कर्मचाऱ्यांनी केली बेदम मारहाण

दारूसाठी पाच रुपये कमी दिल्याने दुकानदाराने केलेल्या मारहाणीत एकाच मृत्यू !

कोलकात्यात दारूच्या दुकानात पाच रुपये कमी दिल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. दुकानदार आणि दुकानातील कर्मचाऱ्यांनी मिळून केलेल्या मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्याआधारे पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.

 

घटना कोलकाता येथील आहे. कोलकाता येथील गरियाहाट रोडवर असलेल्या दारूच्या दुकानात घडली. एक व्यक्ती दारूच्या दुकानात दारू खरेदीसाठी गेला असता दारू खरेदीसाठी पैसे कमी पडल्याने त्याचा आणि दुकानदार मालकाशी वाद झाल्याने दोघांच्या भांडणात दारू खरेदी करण्याऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. सुशांत मंडल असे मृताचे नाव असून तो दुकानातील कर्मचाऱ्याशी वाद घालताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. वाद वाढला आणि दुकानातील एका व्यक्तीने मंडल यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा:

हिंदू-मुस्लिम सौहार्द हवे तर जबरदस्तीने धर्मांतरण, लव्ह जिहाद थांबले पाहिजे!

आरपीएफ जवानाने जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये अधिकाऱ्यासह चार जणांना घातली गोळी

शूर सैनिकांसाठी ‘मेरी माटी मेरा देश’ मोहीम !

दगडूशेठ गणपती दर्शन, लोकमान्य टिळक पुरस्कार, मेट्रो उद्घाटन… मंगळवारी पंतप्रधान पुण्यात

माहितीनुसार, दारू खरेदी करणाऱ्या व्यक्तीकडे दारू खरेदीकरण्यासाठी ५ रुपये कमी पडले.त्यानंतर दुकानदार आणि त्या व्यक्तीचे भांडण सुरु झाले.वाद वाढला आणि दोन्ही पक्षात हातापायी झाली. दुकानदार आणि दुकानातील कर्मचाऱ्यांनी मिळून त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली.सुशांत असं मृत व्यक्तीच नाव आहे.मारहाण करताना सुशांत खाली कोसळला. भांडणानंतर लगेचच सुशांतला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

 

याप्रकरणी रवींद्र सरोवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दुकान मालक देबोज्योती साहा आणि अमित कार, प्रभात दत्ता उर्फ ​​टिंकू आणि प्रसेनजीत बैद्य या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 

या घटनेबाबत बोलताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना गरियाहाट रोडवर असलेल्या एका दारूच्या दुकानात घडली. दोन्ही पक्षांमध्ये पैशाच्या व्यवहारावरून भांडण झाले होते. यानंतर दुकानातील कर्मचाऱ्यांनी आधी सुशांतला मारहाण केली. त्यानंतर तो पडला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.या घटनेमुळे आजूबाजूच्या लोकांनी प्रचंड गोंधळ उडवून दारू दुकानाची तोडफोड करून रस्ता अडवला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना रवींद्र सरोवर पोलिस स्टेशन तसेच तलाव पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे पथक पाठवावे लागले.

Exit mobile version