22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामासाकिनाक्यात सापडला इसमाचा कुजलेला मृतदेह, पत्नीचा शोध सुरू

साकिनाक्यात सापडला इसमाचा कुजलेला मृतदेह, पत्नीचा शोध सुरू

Google News Follow

Related

साकिनाका खैराणी रोड येथील एका चाळीत मागील काही दिवसांपासून बंद असलेल्या खोलीत २३ वर्षीय इसमाच्या मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मृत इसमाची पत्नी बेपत्ता असून तिचा शोध घेण्यात येत आहे. या इसमाची हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी साकिनाका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

नसीम खान (२३) असे मृत इसमाचे नाव आहे. नसीम खान हा पत्नी रुबिनासह काही दिवसांपूर्वीच साकिनाका खैराणी रोड येथील यादव नगर, सरोवर चाळीत भाडेतत्वावर राहण्यास आला होता. टेलरिंगचे काम करणारा नसीम खान यांच्या घरातून सोमवारी सकाळी दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिकांनी पोलीस ठाण्यात केली असता साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

नसीमच्या घराला बाहेरून कुलुप असल्याने पोलिसांनी ते उघडले असता नसीम याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पलंगावर आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पूर्व तपासणीसाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १४ जुलै रोजी नसीमचे वडीलांनी त्याला फोन केला असता तो फोन त्याची पत्नी रुबिना हिने घेतला व नसीमची तब्येत ठीक नसून तो झोपला असल्याचे तिने नसीमच्या वडिलांना सांगितले आणि फोन बंद केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा वडिलांनी फोन केला मात्र फोन बंद असल्यामुळे ते स्वतः त्याला भेटायला घरी आले असता बाहेरून दाराला कुलूप बघून ते निघून गेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हे ही वाचा:

सेबीचे ईमेल अकाउंट हॅक, हॅकरकडून पाठविण्यात आले अनेकांना मेल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता शिवसेनेचे मुख्य नेते; पक्षप्रमुखपदाची जागा रिकामी

लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते राहुल शेवाळे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला १२ खासदार उपस्थित

 

या घटनेपासून नसीम याची पत्नी रुबिना बेपत्ता असून तीचा कसून शोध घेण्यात येत आहे. नसीम आणि रुबिना यांच्यात वारंवार भांडण होत होती. तिनेच नसीमची हत्या केली असावी, असा संशय नसिमच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी साकिनाका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून रुबिनाचा शोध घेण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा