बंगळुरू विमानतळावर तरुणाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

पोलिसांकडून आरोपीला अटक

बंगळुरू विमानतळावर तरुणाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

बंगळूरूच्या केम्पेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीने कुऱ्हाडीने वार करून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने विमानतळ परिसरात खळबळ उडाली असून मृत तरुण हा विमानतळावर ट्रॉली ऑपरेटर म्हणून काम करत होता. मृत तरुणाचे नाव रामकृष्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर, आरोपीचे नाव रमेश असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधांच्या संशयातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. आरोपी रमेश हा बीएमटीसी बसमधून विमानतळावर दाखल झाला. तो बसमध्ये असल्यामुळे त्याची तपासणी (स्कॅनिंग) केली गेली नाही. सामानाचे स्कॅनिंग न झाल्यामुळे तो शस्त्र घेऊन विमानतळावर पोहोचू शकला. त्यानंतर त्याला समजलं की रामकृष्ण हा टर्मिनल १ च्या लेन १ वरील पार्किंगमधील शौचालयाजवळ आहे. त्यामुळे तो ते शस्त्र (कुऱ्हाडीसारखं शस्त्र) घेऊन शौचालयाजवळ गेला. तिथे जाऊन त्याने रामकृष्णवर वार केले. त्यात रामकृष्ण जागीच ठार झाला. आरोपीने पोलिसांना सांगितलं की त्याची पत्नी आणि मृत रामकृष्ण या दोघांचे अनैतिक संबंध होते. त्याच रागातून रमेशने रामकृष्णची हत्या केली. पोलीस रमेशची चौकशी करत असून त्यांनी अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा:

आर.जी. कर दुष्कृत्य प्रकरण: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिक्रिया !

सोनिया-राजीव विवाह हे आयएसआयचे षडयंत्र? आरोपांपेक्षा काँग्रेसचे मौन अधिक गूढ

देशभरात १२ औद्योगिक स्मार्ट शहरे उभारणार

जे जे रुग्णालयात अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी रूमचे उद्घाटन

विमानतळावर घडलेल्या या घटनेनंतर प्रवासी आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. ईशान्य बंगळुरूचे पोलीस उपअधीक्षक म्हणाले, रमेश बेग या प्रकरणातील आरोपीचं नाव असून आम्ही त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याने एक धारदार शस्त्र बाळगलं होतं, ते देखील आम्ही पुरावा म्हणून ताब्यात घेतलं आहे. तसेच सध्या रमेश याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Exit mobile version