गेमिंग ऍपच्या माध्यमातून धर्मांतर प्रकरणाचे मुंब्रा कनेक्शन, ४०० जणांचे धर्मांतर?

गाझियाबाद पोलीस आयुक्तांची धक्कदायक माहिती

गेमिंग ऍपच्या माध्यमातून धर्मांतर प्रकरणाचे मुंब्रा कनेक्शन, ४०० जणांचे धर्मांतर?

उत्तर प्रदेश पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. किशोरवयीन मुलांना ऑनलाइन गेमिंग ऍप्लिकेशनद्वारे लक्ष्य करून त्यांचे धर्मांतर करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अब्दुल रहमान याला गाझियाबादच्या सेक्टर २३ मधील जामा मशिदीमधून अटक केली होती. त्यानंतर या धर्मांतराच्या विषयाचे कनेक्शन महाराष्ट्रातील मुंब्र्यात असल्याची बाब समोर आली आहे.

मुंब्रा येथे सुमारे ४०० जणांचे धर्मांतर झाल्याची धक्कादायक माहिती गाझियाबादच्या पोलीस आयुक्तांनी दिली आहे. गुजरातहून आलेल्या एका फोन कॉलमध्ये तब्बल ४०० जणांचे धर्मांतर करण्यात आल्याचा उल्लेख होता. याप्रकरणी पोलिस अधिकच तपास करत करत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहनवाज खान हा आपल्या कुटुंबियांसोबत मुंब्रा येथील देवरी पाडा परिसरात राहत असल्याची माहिती गाझियाबाद पोलिसांना मिळाली होती. आरोपी शाहनवाज खान ३१ मे पासूनच फरार असून त्याआधी त्याने त्याच्या कुटुंबियांना सोलापूरला पाठवलं होतं.

प्रकरण काय?

आरोपी शाहनवाज खान हा ‘बद्दो’ या डिजिटल नावाने फोर्टनाईटवर खेळत असे. तो ‘फोर्टनाइट’ वर खेळत असलेल्या मुलांना शोधून लक्ष्य करत असे. जेव्हा ही किशोरवयीन मुले गेममध्ये हरत असत, तेव्हा त्यांना जिंकायचे असल्यास कुराणातील आयते वाचण्यास सांगितले जायचे. त्यामुळे ते खेळात जिंकल्यास त्यांचा कुराणावरील विश्वास वाढेल आणि पुढे ते ते इस्लाम स्वीकारतील असा डाव आखण्यात आला होता.

हे ही वाचा:

लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले

दूरदर्शनवरील प्रसिद्ध वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे निधन

इंदिरा गांधी यांची हत्येचे चित्रण कॅनडातील चित्ररथावर

शतकवीर हेड आणि स्मिथची अडीचशे धावांची भागीदारी

आरोपी ऑनलाइन गेमिंग ऍपच्या चॅटिंग प्लॅटफॉर्मवर लक्ष्यित मुलांच्या संपर्कात असायचे. गाझियाबादमध्ये धर्मांतरित झालेल्या एका हिंदू अल्पवयीन मुलाने सांगितले की तो द यूथ क्लब, पाकिस्तान-आधारित YouTube चॅनेल पाहत असे, ज्यामध्ये इस्लामबद्दल चिथावणी देणारे व्हिडिओ होते. तो तारिक जमीलचे व्हिडिओ पाहत असे, जो इस्लामवर कट्टर प्रवचन देत असे. ते व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याने धर्मांतर केल्याची कबुली दिली आहे.

Exit mobile version