मुंबई विद्यापीठाच्या लॉ अभ्यासक्रमाचा पेपर फुटल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या लॉ परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नांसोबत थेट त्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत.
मुंबई विद्यापीठातील लॉ परीक्षेचा आज दुपारी २ वाजता पाचव्या सेमिस्टरचा कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर (सीपीसी) हा पेपर होता. वेळापत्रकानुसार दुपारी २ वाजता हॉलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटण्यात आली. त्यानंतर या प्रश्नपत्रिकेत प्रश्नांसोबत त्यांची उत्तरे देखील देण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हा प्रकार हॉलमधील शिक्षकांच्या लक्षात आणून दिला.
दरम्यान, या प्रकारामुळे विद्यार्थी काही काळ गोंधळून गेले होते. परंतु, ही प्रश्नपत्रिका सध्या सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता विद्यार्थी आणि पालकांमधून विद्यापीठाच्या या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हे ही वाचा:
वीजसंकटावर गृहमंत्री अमित शहा उचलणार पाऊल
बर्लिनमध्ये लहान मुलीच्या चित्राचे केले पंतप्रधान मोदींनी कौतुक
‘शिवसेना नेत्यांना बुद्धिदोष झाला आहे’ आशीष शेलारांची टीका
‘उद्धव ठाकरे भगवे उतरवून हिरवे झालेत’
दरम्यान यापूर्वी बारावी बोर्डाच्या परीक्षेचा गणिताचा पेपर फुटला होता. परीक्षेआधीच हा पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर आला होता. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली होती.