मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर

मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईवर हल्ला होणार असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे.

मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर

मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज आल्याची माहिती समोर आली आहे. सणासुदीच्या काळात हा धमकीचा मेसेज आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. मुंबईवर हल्ला होणार असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे.

मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रुमला आज, २० ऑगस्ट रोजी धमकीचा मेसेज आला आहे. २६/११ सारखा भयानक हल्ला पुन्हा एकदा करणार असल्याची धमकी या मेसेजमधून देण्यात आली आहे. हा हल्ला करण्यासाठी भारतातलेच सहा लोक मदत करणार असल्याचंही लिहिण्यात आलं आहे. कंट्रोल रुमच्या नंबरवर भारताच्या बाहेरील क्रमांकावरून मेसेज आले असून हे धमकीवजा मेसेजेस पाकिस्तानमधून आल्याचे म्हटले जात आहे.

काल राज्यभरात दहीहंडीचा उत्साह होता. तर गणेशोत्सव अगदी तोंडावर असून त्यापाठोपाठ सणांची लगबग सुरू आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर धमकीच्या मेसेजने आता खळबळ माजली आहे. सणासुदीच्या काळात मुंबईवर हल्ल्याचं सावट असून त्यामुळे आता पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

हे ही वाचा:

१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?

कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट

निर्बंधमुक्त दहीहंडीमुळे गोविंदा घेतायत मोकळा श्वास

लोकांना डोलो देऊन डॉक्टरांनी केली १ हजार कोटींची मज्जा

विशेष म्हणजे शस्त्र असलेली एक बोट दोन दिवसांपूर्वीच हरिहरेश्वर किनाऱ्याजवळ आढळून आली होती. ही बोट भरकटून तिथे आल्याचे समोर आले होते मात्र या बोटीत शस्त्र असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यानंतर रायगड आणि आसपासच्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर दोन दिवसांतच धमकीचा मेसेज आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version