पश्चिम बंगालच्या शिकारीकडून मुंबईत तिघांची हत्या ?

वडाळा टिटी पोलिसांकडून मृतदेहाचा शोध सुरु

पश्चिम बंगालच्या शिकारीकडून मुंबईत तिघांची हत्या ?

पत्नीच्या हत्येमध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या बिपुल शिकारीने पश्चिम बंगालच्या तुरुंगात पॅरोलवर बाहेर आल्यावर मुंबईत तीन जणांची हत्या करून मृतदेह पूर्व मुक्त मार्ग वडाळा येथील कंदळवनात फेकले होते, त्या पैकी वडाळा टिटी पोलिसांना १२ वर्षाचा मृतदेह मिळून आला आहे, तर दोन मृतदेहाचा शोध सुरू आहे. हे तिघे वडाळा टिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे असून दोन जण १२ वर्षाचे असून एक जण शिकारी याचा सहकारी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

वडाळा टिटी पोलीस ठाण्यात १४ जानेवारी आणि २८ जानेवारी २०२४ रोजी दाखल असलेल्या दोन अपहरणाचा गुन्ह्यातील एकाचा मृतदेह ३मार्च रोजी वडाळा टिटी पोलिसांना वडाळा खाडी लगत कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता, त्याची ओळख पटविण्यात आली ,२८ जानेवारी रोजी बेपत्ता झालेला १२वर्षाच्या मुलाचा मृतदेह असल्याचे उघडकीस आले होते. आरोपी शिकारी याने या मुलावर लैगिंग अत्याचार करून त्याचा गळा चिरून मृतदेह खाडित फेकून पळ काढला होता. वडाळा टिटी पोलिसांनी बिपुल शिकारी याची पार्श्वभूमी तपासली असता शिकारीला पश्चिम बंगाल मध्ये पत्नीच्या हत्ये प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती, कोरोना काळात तो पॅरोल वर बाहेर आला आणि पुन्हा तो तुरुंगात गेलाच नाही.

पश्चिम बंगाल पोलीस त्याच्या मागावर असल्यामुळे २०२२ मध्ये शिकारी मुंबईत पळून आला, वडाळा येथे तो राजू मंडल या सहकाऱ्याच्या खोलीत राहत होता, व बांधकाम साईडवर वॉचमनची नोकरी करू लागला. वडाळा पोलिसांनी त्याची पार्श्वभूमी तपासल्यानंतर त्याचा माग काढण्यास सुरुवात केली, नऊ राज्ये पालथी घातल्यानंतर शिकारी हा दिल्ली येथील कमला मार्केट येथील कुंटनखाना येथे मिळून आला. गेल्या आठवड्यात शिकारीला खबऱ्याच्या मार्फत शोध घेऊन त्याला अटक करून मुंबईत आणले. मुंबई पोलिसांच्या चौकशीत त्याने आणखी दोन हत्येची कबुली दिली, सर्वात प्रथम शिकारीने त्याचा रुम पार्टनर राजू मंडल याची डिसेंबर २०२३ मध्ये हत्या करून मृतदेह वडाळा येथील कंदळवनात फेकून दिला. त्यानंतर १२ जानेवारी रोजी घरातून बेपत्ता झालेल्या १२ वर्षाच्या मुलाची हत्या केली त्याचा मृतदेह देखील कंदळवनात त्याच ठिकाणी फेकला.

हे ही वाचा :

पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज मोनाची कांस्य पदकाची कमाई

आसाम विधानसभेत दोन तासांचा नमाज पठणाचा ब्रेक रद्द !

काँग्रेसवाल्यांना छत्रपतींची आठवण आली हेही नसे थोडके…

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन भाजपात सामील !

२८ जानेवारी रोजी १२ वर्षाच्या दुसऱ्या मुलावर लैगिंग अत्याचार करून त्याचे मुंडके धडापासून वेगळे करून मृतदेह खाडीत फेकला, अशी कबुली बिपुल शिकारीने वडाळा टिटी पोलिसांना दिली, तसेच पश्चिम बंगाल मध्ये पत्नीच्या हत्येपूर्वी पत्नीला पहिल्या पतीपासून झालेल्या २ वर्षाच्या मुलीची हत्या केली होती, या गुन्ह्यात त्याला अटक झालेली नव्हती. बिपुल शिकारीने वडाळा पोलिसांना राजू मंडल आणि दुसऱ्या १२ वर्षाच्या मुलाचे मृतदेह फेकले ती जागा दाखवली,असून मागील तीन ते चार दिवसांपासून वडाळा टिटी पोलिस ठाण्याकडून हे दोन्ही मृतदेह शोध घेत असून अद्याप दोन्ही मृतदेह मिळाले नाहीत. मृतदेह शोधण्यासाठी वडाळा टिटी पोलिसाकडून अत्याधुनिक पद्धतीचा वापर केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version