काळबादेवी येथील अंगाडीयाच्या कार्यालया वर पडलेल्या ४ कोटीच्या दरोड्यातील आरोपी च्या ३० तासांत मुसक्या आवळण्यात आल्या आहे. गुजरात राज्यात तपास कामी गेलेल्या एल.टी.मार्ग पोलीस ठाण्याच्या एका पथकाने गुजरात मधून मुंबईत येताना पालघर येथून या दरोड्यातील आरोपींना अटक करून मुंबईत आणले. दरोड्याचा गुन्हा ३०तासांत उघडकीस आणून दरोड्यातील सर्व रोकड एल.टी. मार्ग पोलिसांनी जप्त केली आहे.
रविवारी सकाळीच दक्षिण मुंबईतील काळबा देवी परिसरात असलेल्या आदित्य हाईट्स या इमारतीत असणाऱ्या एका अंगाडीयाच्या कार्यालयात दरोडा पडला होता.दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत कर्मचाऱ्याना बांधून त्यांनी ओरडू नये म्हणून तोंडाला चिकटपट्टी लावून कार्यालयातील ४.३कोटींची रोकडसह पोबारा केला होता.या प्रकरणी एल.टी. मार्ग पोलिसांनी दरोड्या चा गुन्हा दाखल करून दरोडेखोरांच्या मागावर एक पथक पाठविण्यात आले होते.या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता दरोडेखोरांपैकी एक जण अंगाडीया कडे पूर्वी काम करणारा नोकर हर्षद ठाकूर हा असल्याचे समोर आले.
हेही वाचा :
मुंबई महापालिकेचे गेल्या २५ वर्षांच्या ऑडिटसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करणार
आयपीएल २०२४च्या लिलावासाठी ३३३ खेळाडू सज्ज
मुंबईतील व्यापाऱ्याला घरात ओलीस ठेवून ५५ लाखांचा ऐवज केला लंपास!
हातमिळवणी काँग्रेससोबत अपेक्षा मोदींकडून
दरम्यान पोलीस पथकाने पळून गेलेल्या दरोडेखोरांचा माग काढला असता हे दरोडेखोर बोरिवलीच्या दिशेने टॅक्सीने गेल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर या दरोडेखोरांनी बोरिवली नॅशनल पार्क येथे टॅक्सी सोडून एका खाजगी मोटारीने गुजरातच्या दिशेने पळ काढला असल्याची माहिती समोर आली आहे.एल.टी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांनी तात्काळ गुजरात येथे दुसऱ्या तपासासाठी गेलेल्या पोलीस पथकाला सतर्क केले व त्यांना दरोडेखोरांच्या मोटारीची माहिती दिली.गुजरातला दुसऱ्या तपास कामी गेलेल्या पथक मुंबईकडे रवाना झाले होते, त्यांनी गुजरातच्या दिशेने निघालेल्या दरोडेखोराच्या मोटारीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
प्रत्येक ढाबे, चेकपोस्ट,टोलनाक्यावर पोलीस पथकाने या मोटारीचा माग काढला असता पालघर येथे ही मोटार पोलीस पथकाच्या तावडीत सापडली.पोलिसानी या मोटारीतील ६ दरोडेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांना मोटारीसह सोमवारी सायंकाळी मुंबईत आणण्यात आले.हर्षद चेतनजी ठाकूर (२६),राजूबा वाघेला(२१), अशोकभा वाघेला(२६)चरणभा वाघेला (२६),मेहुलसिंग ढाबी (२४) आणि चिरागजी ठाकूर(२६) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
हर्षद ठाकूर हा अंगाडीयाच्या कार्यालयातील माजी कर्मचारी होता. अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांकडून पोलिसांनी दरोड्यातील सर्व रक्कम जप्त केली आहे.