जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत मुंबईमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे. या सात महिन्यांमध्येच मुंबईत अवघ्या साडे पाचशे बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर सुमारे ११०० च्या आसपास विनयभंगाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांची ही आकडेवारी असून या आधारे मुंबईत महिलांविरोधातील गुन्हांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.
सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समोर येणाऱ्या बलात्काराच्या घटनांनी सारा देश हादरून गेला आहे. या सर्व घटनांमध्ये मुंबई येथे घडलेला गुन्हा एवढा भीषण स्वरूपाचा होता की थेट राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची दखल घेत आपले पथक मुंबईमध्ये पाठवले. या सर्व घटनांच्या दरम्यानच मुंबई पोलिसांची एक धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. २०२१ या वर्षात जानेवारी ते जुलै या पहिल्या सात महिन्यांमध्येच बलात्काराच्या साडे पाचशे घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा अधिक आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२० साली जानेवारी ते जुलै या सात महिन्यात मुंबईमध्ये बलात्काराच्या ३७७ गुन्ह्यांची नोंद झाली होती. तर त्यातील २९९ घटनांमध्ये आरोपींचा शोध लागला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
शिवसेना उत्तर प्रदेश निवडणूकीच्या रिंगणात! यावेळी तरी डिपाॅझिट वाचणार?
ठाकरे सरकार बेजबाबदार आणि असंवेदनशील! महिला आयोगाचे ताशेरे
पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करणारा ख्रिस्ती भोंदू अटकेत
मेडवेडेवने जिंकले ‘अमेरिकन ड्रीम’! जोकोविचचे ऐतिहासिक स्वप्न भंगले
या सोबतच मुंबईमध्ये विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाल्याचे दिसत आहे. २०२० साली पहिल्या सात महिन्यांमध्ये मुंबईत विनयभंगाचे ९८५ गुन्हे नोंदवण्यात आले होते. पण या वर्षी हा आकडा ११०० वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबई ही महिलांसाठी असुरक्षित होत चालली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.