मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एर्टिगा कारचा झाला चक्काचूर, पाच जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एर्टिगा कारचा झाला चक्काचूर, पाच जणांचा मृत्यू

खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खालापूर येथे गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर किमान तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. एर्टिगा कारने मागून दुसऱ्या वाहनाला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच देवदूत, आयआरबी, बोरघाट पोलीस आणि इतर यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर जखमींना बाहेर काढून नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कारमध्ये एकूण ७ जण होते. यातील पाच जणांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत एक महिला थोडक्यात बचावल्याचं सांगण्यात येत आहे. दोन्ही गंभीर जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा : 

कर्नाटक सरकारचा ‘गो रक्षणा’साठी मोठा निर्णय

मनसे उधळणार राहुल गांधींची शेगावमधील सभा

भारतात येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ

आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रकल्पांना स्थगिती

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटजवळ हा अपघात झाला. जखमी प्रवाशांना तातडीने नवी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात एर्टिगा कारचा चक्काचूर झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण कार अपघातामुळे मुंबईकडे जाणार्‍या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Exit mobile version