तो आत्महत्या करणार होता,पण पोलिसांनी त्याला वाचवले!

मुंबई पोलिसांची सतर्कता

तो आत्महत्या करणार होता,पण पोलिसांनी त्याला वाचवले!

नोकरी नाही, व्यवसायात सतत होणारे नुकसान, वडिलांचे आजारपण, कोरोनाचा काळ यातून कर्जबाजारी झालेल्या २६ वर्षीय तरुणाने आत्महत्येचा निर्णय घेतला, आणि त्याने ट्विटर वर “मी आत्महत्या करत आहे. त्यापूर्वी मला माझे अवयव दान करायचे आहे अशी पोस्ट टाकून आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाचा शोध घेऊन त्याला आत्महत्ये पासून परावृत्त करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.

हा तरुण कर्जत येथे राहणारा असून सायन्स मधून त्याने बारावी पर्यत शिक्षण घेतले आहे,पुढे शिकण्याची इच्छा असून देखील घरातील हालखीच्या परिस्थितीमुळे त्याला शिक्षण अर्धवट टाकून नोकरी करावी लागली होती. नोकरीतून मिळणाऱ्या तुटपुंजी पगारातून घरातील खर्च भागत नाही म्हणून त्याने बँकेकडून कर्ज काढून स्वतःचा व्यवसाय सुरू केला, व्यवसायातील अनुभव कमी पडत असल्यामुळे त्यात सतत नुकसान होऊन व्यवसाय बंद पडला. छोटा मोठा व्यवसाय करून बँकेचे कर्ज फेडले,व्यवसायात जम बसू लागताच कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि व्यवसायाची घडी पुन्हा विस्कटली आणि व्यवसाय बंद पडला.

नोकरी नाही,व्यवसाय नाही घर कसे चालेल म्हणून मित्राकडून कर्ज घेतले आणि कोरोना काळात कसेबसे दिवस काढले, लॉकडाऊन मध्ये रस्त्यावर फिरून चहा विकून मित्राचे कर्ज फेडले. चहा च्या व्यवसायात जम बसू लागताच काही मुलांना कामाला ठेवले मात्र त्यांनी विश्वासघात केल्यामुळे चहा चा व्यवसाय ही गुंडाळावा लागला.त्यात वडिलांचे आजारपण पुढे आले, वडिलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी पुन्हा कर्जाचा डोंगर डोक्यावर चढला. नोकरी नाही व्यवसायात सतत होणारे नुकसान त्यात बँकांचे रिकव्हरी एजंटचा कर्ज फेडण्यासाठी मागे लागलेल्या तगादा यामुळे अखेर  मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

मी हे आधी करणार होतो पण मला माहित आहे की माझ्या कुटुंबाकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नाहीत, मी जिवंत असताना कुटुंबाला काहीही देऊ शकत नसलो तर मेल्यानंतरही मला त्यांना त्रास देण्याचा अधिकार नाही. मी सध्या खूप रडत आहे कारण मी माझ्या कुटुंबासाठी काहीही करू शकलो नाही. माझे डीएमएस खुले आहेत, मी आधीच काही डॉक्टरांना टॅग केले आहे, कृपया मला डीएम मध्ये कळवा की अवयव दान कसे करावे ही प्रक्रिया काय आहे. मला या प्रक्रियेबद्दल आणि सर्व काही माहित नाही. त्यामुळे कृपया मदत करा. ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. या तरुणाने स्वतःच्या ट्विटर खात्यावरून ट्विट केली होती, त्यात अनेक डॉक्टरांना त्याने टॅग केले होते.

हे ही वाचा:

अधिक युक्तिवादाची गरज .. सत्तासंघर्षांवर आता २१ फेब्रुवारीला सुनावणी

गिरीश बापट यांच्यामुळे कसब्याचा गड मजबूत

राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पणदिनानिमित्त विशेष कार्यक्रम

मेघालय नंतर आता काश्मीरला भूकंपाचे धक्के

मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅन्डल वर ही पोस्ट येताच मुंबई गुन्हे शाखा आणि सायबर सेल कामाला लागले व तांत्रिक मदतीने या तरुणाचा पत्ता शोधून काढत त्याचा शोध घेतला असता कर्जत रेल्वे स्थानक परिसरातून त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्याचे समुपदेशन करून त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. मुंबई पोलिसांनी या तरुणांच्या आई वडिलांना बोलावून या तरुणाला त्यांच्या ताब्यात दिले. तरुण मुलाचा जीव वाचवून त्याला आत्महत्ये पासून परावृत्त केल्यामुळे आई वडिलांच्या मुंबई पोलिसांच्या मनापासून आभार मानले आहे.

Exit mobile version