घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी आरोपी भावेश भिंडे विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल करणार

जामीन मिळालेल्या संघूच्या जमीनाला उच्च न्यायालयात आव्हान देणार

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी आरोपी भावेश भिंडे विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल करणार

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणातील आरोपी भावेश भिंडे याने उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेविरोधात गुन्हे शाखा प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. तसेच, याप्रकरणात जामीन मिळालेल्या मनोज संघू याच्या जमीनाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे गुन्हे शाखेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

घाटकोपरच्या छेडानगरमधील महाकाय होर्डिंग १३ मे ला पेट्रोल पंपावर कोसळून घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथक तपास करत आहे. या पथकाने इगो मीडिया प्रा. लि. कंपनीचे संचालक भावेश भिंडे, माजी संचालक जान्हवी मराठे-सोनलकर, दुर्घटनाग्रस्त होर्डिंगला तपासणी न करताच फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या मनोज संघू आणि होर्डिंग उभारणार कंत्राटदार सागर कुंभारे यांना अटक करत त्यांच्याविरोधात न्यायालयात तीन हजार २९९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

हे ही वाचा:

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव भरला !

मुंबईतील ग्रँट रोड परिसरात म्हाडाच्या इमारतीचा काही भाग कोसळला

धक्कादायक: हात-पाय बांधून जवानाला पत्नीकडून विषप्रयोग !

राष्ट्रीय सुरक्षेसाठी व्यापक धोरणाची अंमलबजावणी करा

न्यायालयाने संघू याला १५ जुलैला जमीन मंजूर केला आहे. त्याच्या जमीनाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे गुन्हे शाखेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. तर, भावेश भिंडे याने जमीन आणि दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या विरोधात गुन्हे शाखा प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे.

Exit mobile version