मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज सेमीफायनलचा महासंग्राम रंगणार आहे.टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सेमी फायनल सामन्यादरम्यान काही मोठ्या घटना घडतील, अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीनं ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना दिली आहे.धमकी देणाऱ्या व्यक्तीनं ट्विटरवर मुंबई पोलिसांना बंदूक, हँडग्रेनेड आणि गोळ्यांच्या फोटोमध्ये टॅग केलं आहे.पोलिसांनी शोध मोहीम राबवत धमकी देणाऱ्या तरुणाला अटक केली असून हा तरुण अवघा १७ वर्षांचा आहे.धमकी देणारा तरुण हा विराट कोहलीचा चाहता असून, त्याने धमकी का दिली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून स्टेडियमवर आणि परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ठीक-ठिकाणी तपासणी केली जात आहे.
दिवाळीची सुट्टी असल्याने इंडिया विरुद्ध न्यूझीलंडचा आजचा सामना पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली आहे.याचा जल्लोष देशभरात पाहायला मिळणार आहे.मात्र, या सामनादरम्यान वानखेडेवर मोठ्या घटना घडणार असल्याची धमकी मुंबई पोलिसांना ट्विटरद्वारे देण्यात आली आहे.धमकी देणाऱ्याने ट्विटरवर मुंबई पोलिसांना बंदूक, हँडग्रेनेड आणि गोळ्यांच्या फोटोमध्ये टॅग केलं आहे. तसेच सामन्यादरम्यान आम्ही आग लावू असा मेसेजही देण्यात आला आहे.
त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवत धमकी देणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी मुंबई पोलीस गुन्हे शाखेने लातूर जिल्ह्यातील १७ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले.धमकी देणारा तरुण विराट कोहलीचा मोठा चाहता आहे, त्याने का धमकी दिली हे अद्याप समजू शकलेले नाही.
हे ही वाचा:
५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान हादरले
सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात
टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेवर बलात्कार!
कुत्र्याने बंगळुरूला परतून लावले विस्तारा विमान!
दरम्यान, मुंबई पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहता वानखेडे स्टेडियमवर आणि परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आज मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर येत असल्यानं मुंबई पोलीस गेल्या दोन दिवसांपासून याची तयारी करत आहेत. मुंबई पोलिसांनी या सर्व परिसरात बॅरिकेटिंग केली असून वानखेडे स्टेडियमच्या आत जाणाऱ्या सर्व गेटच्या रोडवर झिरो पार्किंग करण्यात येणार आहे.
दरम्यान, न्यूझीलंडनं २०१९ सालच्या विश्वचषकात भारताला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळं त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी रोहित शर्माच्या भारतीय संघाला आज वानखेडे स्टेडियमवर मिळणार आहे.