राज्यात सध्या मशिदीवरील भोंग्याच्या वादामुळे वातावरण तापलेलं आहे. या वादाचे पडसाद आता सोशल मीडीयावर दिसू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आक्षेपार्ह पोस्टवर महाराष्ट्र पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांची ‘सोशल मीडिया लॅब’ सक्रिय करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.
राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला या मुद्द्यावरून वाद पेटू लागला. सोशल मीडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर आणि समाजात तेढ निर्माण होतील अशा मेसेजेसवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचे ‘सोशल मीडिया लॅब’ आता सक्रिय झाले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील वाद निर्माण करणाऱ्या जवळपास ३ हजार पोस्ट सोशल मीडियातून डिलीट करण्यात आल्या असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि जातीय तेढ निर्माण होतील असे मेसेज पाठवू किंवा फॉरवर्ड न करण्याचं आवाहनही केलं आहे.
हे ही वाचा:
कुरापती चीनने सीमेवर उभारले तीन टॉवर
लाऊडस्पीकरसाठी येणार राज्यात नव्या गाईडलाईन्स?
नवाब मलिकांना २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
शेअर बाजार घसरला, तर सोनं-चांदी तेजीत
दरम्यान, नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी ३ मे पर्यंत भोंग्यांसाठी परवानगी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसे न केल्यास कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर राज्याच्या गृहखात्यानेही पावले उचलली असून भोंगे लावण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे.