उर्फी जावेदला अंबोली मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस

चित्रा वाघ यांच्या लढ्याला यश

उर्फी जावेदला अंबोली मुंबई पोलिसांनी  बजावली नोटीस

मॉडेल उर्फी जावेदच्या सार्वजनिक ठिकाणी अंग प्रदर्शनाच्या विरोधातील मुद्दा भाजप नेत्या चित्र वाघ सातत्याने यांनी सातत्याने उचलून धरला आहे. या प्रकरणावरून उर्फी जावेदने चित्र वाघ यांच्या विरोधात तक्रार ही दाखल केली होती. शुक्रवारी सोलापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेतही चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही अशी ठाम भूमिका कायम ठेवली. वाघ यांच्या लढ्याला यश आले आहे. सार्वजनिक ठिकाणी अंग प्रदर्शन प्रकरणी उर्फी जावेदला अंबोली मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. अंबोली पोलिस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार आहे. वाघ यांनी या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दाखल आता पोलिसांनी घेतली आहे.

गेल्या काही दिवसात भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे म्हटले होते. असला नंगानाच खपवून घेणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी उर्फी जावेद हीला दिला होता. त्यानंतर उर्फीनेही आपला नंगानाच असाच सुरु राहणार म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिले होते. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी उर्फीवर अश्लीलतेचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली होती. यासोबतच चित्रा यांनी उर्फीला अटक करण्याची मागणी केली. उर्फी अश्लील कपडे परिधान करून मुंबईच्या रस्त्यांवर अश्लीलता पसरवत असल्याचे चित्राने आपल्या तक्रारीत म्हटले होते.

कोणता धर्म सांगतो असं उघडं-नागडं फिरा? ज्या धर्माची उर्फी आहे, ते हिजाबवरुन भांडणं करत आहेत आणि इंथे धर्माचा विषयच नाही. याठिकाणी विषय विकृती आहे असा स्पष्ट आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा. उर्फी जावेदच्या कपड्यांना माझा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार. त्यामुळे हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही असा थेट इशारा चित्र वाघ यांनी उर्फी जावेदला दिला होता. पोलिसांनी उर्फीला शनिवारी हजर होण्याची नोटीस जारी केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शैला कोराडे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेनंतर उर्फी जावेदने शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली होती . उर्फीच्या वकिलाने नुकतीच भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी उर्फीने स्वत: या संपूर्ण प्रकरणाबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली. सार्वजनिक ठिकाणी अंग प्रदर्शनाच्या विरोधात सामाजिक संघटना देखील आक्र्मक झाल्या असल्याचे दिसत आहे. उर्फीच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी या संस्थांनी केली आहे.

Exit mobile version