24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामासंजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर अडचणीत

संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर अडचणीत

अटक झाल्यानंतरही संजय राऊत यांचा त्रास कमी होताना दिसत नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून त्यांचे व्यावसायिक भागीदार सुजित पाटकर यांच्याविरुद्ध मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटकर यांच्यावर जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप आहे.

Google News Follow

Related

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत सध्या तुरुंगात आहेत. त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली.राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊत यांच्यानंतर आता त्यांचे व्यवसाय भागिदार सुजित पाटकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजित पाटकर आणि इतर काही जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवस अगाेदरच सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्या मुंबईतील मालाड येथील फिल्म स्टुडिओचा घोटाळा उघडकीस आणला हाेता. किरीट सोमय्या यांनी या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना माहिती दिली आहे. त्यानंतर अस्लम शेख आणि भाजप नेते मोहित कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली.

हे ही वाचा:

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

दिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या

पाकिस्तानात ब्राह्मोस पडल्याप्रकरणी तीन अधिकारी बडतर्फ

काय आहे प्रकरण

किरीट सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार, १०० कोटी रुपयांच्या कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी आयपीसीच्या कलम ४२०, ४०६, ४६५आणि ३०४ (ए) अंतर्गत संजय राऊत यांचे व्यावसायिक भागीदार सुजित पाटकर, लाईफ लाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्या शिफारशीवरून हे कंत्राट देण्यात आले. कोविड रुग्णांच्या उपचाराच्या नावाखाली ३८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. वरळी, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड आणि पुणे येथे बांधण्यात येणाऱ्या जंबो कोविड सेंटरचे कंत्राट फसवणूक कंपनीला मिळाले होते असा अराेप साेमय्या यांनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा