मुंबईत तीन दहशतवादी घुसल्याच्या फोन नंतर खळबळ, पोलीस सतर्क

मुंबईत तीन दहशतवादी घुसल्याच्या फोन नंतर खळबळ, पोलीस सतर्क

मुंबईत तीन दहशतवादी घुसले असल्याचे एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलीस कंट्रोलला फोन करून सांगितल्यामुळे खळबळ माजली आहे. या फोनमुळे मुंबई पोलीस आता सतर्क झाले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. याआधी देखील अशाच प्रकारचे कॉल मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आले होते. पण ते बोगस कॅल ठरेल होते. मुंबई पोलिस या नवीन कॉलकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत. या प्रकरणी अद्याप नवीन माहिती मिळविलेली नाही. पण पोलीस सतर्क होऊन पुढील तपास करत आहेत.

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी तीन दहशतवादी शहरात खुलेआम फिरत असल्याची माहिती मिळाली. फोन करणार्‍याने सांगितले की, पाकिस्तानातील तीन दहशतवादी शुक्रवारी सकाळी दुबईमार्गे मुंबईत पोहोचले आहेत. या दहशतवाद्यांचे कनेक्शन पाकिस्तानशी आहे. एवढेच नाही तर फोन करणार्‍याने पोलिसांना मुजीब सय्यदचे नाव सांगितले आणि त्याचा मोबाईल नंबर आणि वाहन क्रमांकही पोलिसांना दिला.राजा ठोंगे असे फोन करणाऱ्याचे नाव असून त्याने कंट्रोल रूमला फोन केला. या कॉलनंतर आता पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, ही माहिती खोटी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

“राहुलला शिक्षा ठोठावणाऱ्या जजची जीभ कापू”

हुगळीत धावणार देशातील पहिली पाण्याखालून जाणारी मेट्रो

अजित पवारांनी संजय राऊतना पाडले तोंडघशी; ईव्हीएम रद्द करण्याबाबत व्यक्त केले वेगळेच मत

दिल्लीवरून डेहराडूनला जा फक्त २ तासांत

याआधी मागील महिन्यात एक मार्चला रात्री ११ वाजता एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलीस कंट्रोलला फोन करून येत्या १० मिनिटांत कुर्ल्यात स्फोट होणार असल्याचे सांगितले होते. हे सांगून त्याने कॉल डिस्कनेक्ट केला. फोन कॉल होताच पोलिसांनी वेळ न दवडता तपासासाठी एक पथक तयार केले होते. मात्र, तासाभराच्या तपासानंतरही पोलिसांना तेथून कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी सागरी मार्गाने पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू तर ३०० जण जखमी झाले होते. या घटनेच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. त्यामुळे पोलीस सतर्क झाल्याचे दिसून येत आहेत.

Exit mobile version