नवीन वर्षाच्या स्वागतासाठी १३ हजार पोलीसांचा शहरात बंदोबस्त

मुंबई पोलिसांची सज्जता

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी १३ हजार पोलीसांचा शहरात बंदोबस्त

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहे. यंदा सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरणार असल्याची शक्यता आहे.थर्टीफर्स्टच्या या जल्लोषाला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलीस देखील तेवढ्याच ताकदीने सज्ज झालेली असून पोलिसांनी शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

३१ डिसेंबर (थर्टीफर्स्ट) दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अनेकानी शहराच्या बाहेरची वाट धरली असली तरी मुंबईत थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर तसेच आसपासच्या शहरातील नागरिक मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, समुद्र किनाऱ्यावर सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने एकत्र जमतात. मुंबईत साजरा होणारा थर्टी फर्स्ट या उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून यासाठी मुंबई पोलिसांकडून पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

अभिषेक सोहळ्यापूर्वी राम मंदिराच्या प्रतिकृतीची प्रचंड विक्री!

हाती गोदावरीच्या पाण्याचा कलश घेऊन नाशिकचा रामभक्त अयोध्येला पायी निघाला

ठाकरे गट स्वबळावर लोकसभेची एकही सीट निवडून आणू शकत नाही

सीआयएसएफच्या महासंचालकपदी आयपीएस नीना सिंग यांची नियुक्ती!

यंदा मुंबईत २२ पोलीस उपायुक्त, ४५ सहाय्यक पोलीस आयुक्त, २ हजार५१ पोलीस अधिकारी, ११ हजार ५०० पोलीस अंमलदार, ४६ राज्य राखीव दलाच्या तुकड्या,३ रॅपिड फोर्स आणि १५ जलद गती पथक बंदोबस्ता साठी तयार करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे. तर रॅश ड्रायव्हिंगपासून ते तळीरामांपर्यंत सर्वांवर कारवाई करण्यासाठी अडीज हजार वाहतूक पोलीस शहरात तैनात असणार आहेत. मुंबई पोलीसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार असून गर्दीचे ठिकाणी पेट्रोलिंग तसेच फिक्स पॉईंट नेमण्यात येणार आहेत.

त्याचप्रमाणे वाहतुक नियमांचे उल्लंघन व “ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह” विरोधात विशेष मोहिम राबविणेत येणार आहे. तसेच विविध आस्थापना व गुन्हेगारांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. मद्य पिऊन वाहन चालवणारे व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे व्यक्ती, महिलांची छेडछाड करणारे व्यक्ती, अनधिकृत मद्य विक्री करणाऱ्या आस्थापना, अंमलीपदार्थ विक्री आणि सेवन यासारखी बेकायदेशीर कृत्य करणारे व्यक्ती यांचे विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी नियमांचे भान ठेवून नववर्ष आगमन उत्साहाने व जल्लोषात साजरे करावे असे आवाहन मुंबई पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version