स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिपण्णीबद्दल त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन समन्सनंतरही कामरा चौकशीसाठी हजर राहिलेला नाही. मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर न राहिल्यानंतर मुंबई पोलिसांनी कुणला कामरा याला आता तिसरे समन्स बजावले आहे. या समन्समधून पोलिसांनी त्याला ५ एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.
कुणाल कामरा याने एका कार्यक्रमात सादर केलेल्या कवितेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. पोलिस तक्रारी दाखल झाल्यानंतर त्याने मद्रास उच्च न्यायालयातून या प्रकरणात ७ एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मिळवला आहे. कामरा हा तामिळनाडूचा कायमचा रहिवासी आहे.
Comedian Kunal Kamra row | Mumbai Police has issued a third notice to Kunal Kamra to appear on 5th April and record his statement. Mumbai Police had called Kunal Kamra twice before for questioning, but he did not appear: Mumbai Police
— ANI (@ANI) April 2, 2025
शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून २४ मार्च रोजी एफआयआर नोंदवल्यानंतर मुंबई पोलिसांनी कामरा यांना यापूर्वी दोन समन्स पाठवले होते. खार पोलिस ठाण्यात विनोदी कलाकाराविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एक तक्रार जळगाव शहराच्या महापौरांनी दाखल केली होती, तर इतर दोन तक्रार नाशिकमधील एका हॉटेल व्यावसायिकाने आणि एका व्यावसायिकाने दाखल केल्या होत्या, असे मुंबई पोलिसांनी सांगितले. राज्यभरात दाखल करण्यात आलेले तीन गुन्हेही खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहेत.
हे ही वाचा :
“अवामी लीगचे एक लाखाहून अधिक सदस्य भारतात पळून गेले”
कुरापती पाककडून एलओसीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारताकडून सडेतोड उत्तर
चीनची चाटुगिरी फळली नाही, राहुलना चिनी चापट…
‘रस्ते वाहतुकीसाठी आहेत, प्रार्थनेसाठी नाहीत’, हिंदूंकडून शिस्त शिका!
२३ मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओमध्ये, कुणाल कामराने गाण्याचे विडंबनात्मक रूप सादर करत एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले होते. या कृत्याला तीव्र विरोध झाला आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळाची तोडफोड केली. कुणाल कामरा याने या प्रकरणात पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सध्या तो मुंबईत नसल्याची माहिती आहे. तसेच सादर केलेल्या गाण्याबद्दल माफी मागणार नसल्याचेही कुणाल कामरा याने स्पष्ट केले होते.