बांगलादेशी पाठोपाठ अफगाणी नागरिक मुंबईत बेकायदेशीररित्या वास्तव्य करीत असल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाईतून समोर आला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शिवडी येथून एका अफगाणी नागरिकाला बनावट कागद्पत्रासह अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या अफगाणी नागरिकाविरुद्ध रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या अफगाणी नागरिकाने बनावट कागदपत्रे कुठे तयार केले याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.
हबीबुल्ला प्रांग (३८) असे अटक करण्यात आलेल्या अफगाणी नागरिकाचे नाव असून प्रांग हा मुंबईत झहीर खान नावाने शिवडीतील नॅशनल मार्केट मध्ये २००७ पासून बेकायदेशीररीत्या राहण्यास होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ५ चे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या पथकाला या अफगाणी नागरिकांची माहिती मिळाली असता कक्ष ५ च्या पथकाने बुधवारी रात्री नॅशनल मार्केट या ठिकाणी छापेमारी टाकून हबिबुल्ला याला ताब्यात घेण्यात आले.
हे ही वाचा:
हिरानंदानी समुहावर ईडीचे छापे, फेमा कायद्याअंतर्गत छापेमारी
जे.पी.नड्डा-चव्हाण यांची बंद दाराआड चर्चा…
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात, प्रकृती चिंताजनक
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात, प्रकृती चिंताजनक
त्याच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्याने प्रथम पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, त्याने त्याचे नाव झहीर खान असे सांगून तो भारतीय असल्याचे पुरावे गुन्हे शाखेकडे सादर केले. त्याने सादर केलेल्या पॅनकार्ड , वाहन परवाना या कागदपत्रांची पडताळणी केली असता ही कागदपत्रे बोगस असल्याची आढळून आली.
त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे खरे नाव हबीबुल्ला प्रांग असे असल्याचे सांगून २००७ मध्ये तो अफगाण देशातून भारतात बेकायदेशीररित्या आला होता. अफगाणिस्तान मधील जिल्हा झुरामत, पक्तिया प्रांत येथे राहणारा आहे. बेकायदेशीररित्या भारतात आलेल्या हबीबुल्ला प्रांग याने मुंबईत बनावट कागदपत्रे तयार करून स्वतःचे नाव बदलून झहीर खान असे ठेवले होते. गुन्हे शाखाने रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.