मुंबई मे हमला होने जा रहा है, २६-११ की याद दिलाएगा

मुंबई पोलिसांनी जारी केले धमकीचे चॅट

मुंबई मे हमला होने जा रहा है, २६-११ की याद दिलाएगा

मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मुंबईवर हल्ला करण्याची तयारी काही लोक करत आहेत. त्यासंदर्भात मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पत्रकारांना माहिती दिली त्यात हे चॅट समोर आले. हे चॅट हिंदीत असून त्यात मुंबईवर हल्ला करण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट होत होते.

यात एक व्यक्ती मुंबई पोलिसांना म्हणते जी, मुबारक हो. मुंबई मे हमला होने वाला है. २६-११ की नई ताजी याद दिलाएगा. मुंबई को उडाने की तैय्यारी कर रहे है. यूपी एटीएस करवाना चाहती है मुंबई उडाना. यासंदर्भात यूपी एटीएसचा एक नंबरही शेअर करण्यात आला. सोबत आणखी ६ क्रमांकही शेअर केले.

मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमच्या व्हाट्सपवर धमकीचे मेसेज करणाऱ्या व्यक्तीने यूपी एटीएसचा नंबर शेअर केल्याचं स्पष्ट झाले.

जे ७ नंबर समोरच्या व्यक्तीने मुंबई पोलिसांना पाठवले, त्यातील एक नंबर यूपी एटीएसचा आहे.यूपी एटीएसशी महाराष्ट्र पोलिसांनी संपर्क केल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाले. बाकीचे नंबरसुद्धा वेगवेगळ्या तपासयंत्रणांचे असल्याचे समोर आले आहे. जो नंबर समोरच्या आरोपीने शेअर केलाय तो यूपी एटीएसमधील एका अधिकाऱ्याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात मुंबई पोलीस आणि एटीएसच्या आम्ही संपर्कात असल्याचही यूपी एटीएसने म्हटले आहे.

हे ही वाचा:

मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर

‘फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू’

१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?

गर्भवती महिलेसाठी जीप चिखलाच्या रस्त्यावरून आठ किमी ढकलली

 

दुसऱ्या चॅटमध्ये सदर अज्ञात व्यक्ती म्हणतो की, और यह धमकी नही हम हकीकत मे आएंगे. मेरा लोकेशन यहाँ का एड्रेस करेगा लेकीन काम मुंबई मे चलेगा. हम लोगो का कोई ठिकाना नही होता. लोकेशन आपको आऊट ऑफ कंट्री ट्रेस होगी. हमला २६-११ मुंबई मे होगा.

चॅटमध्ये पुढे तो म्हणतो की, उदयपूर जैसा भी कांड हो सकता है सर तन से जुदा. याद होगा पंजाब का सिद्धू मुसेवाला. इस तरह की हरकते भी हो सकती है. पुढील चॅटमध्ये लिहिले आहे की, मुंबई उडाने की पुरी तैय्यारी है. बस टाइम कुछ ही बाकी है. २६-११ याद होगा नही दोबारा उससे भी अच्छा होगा

 

Exit mobile version