29 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाहल्ल्याबाबतचे धमकीचे संदेश पाकिस्तानातून आले

हल्ल्याबाबतचे धमकीचे संदेश पाकिस्तानातून आले

मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

मुंबईवर झालेल्या २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्याबाबतचे धमकीचे संदेश पाकिस्तानातून आले आहेत. हे संदेश ज्या क्रमांकावरून पाठवले गेले ते देशाबाहेरचे होते. या धमकी संदर्भात वरळी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई पोलिस या धमकीच्या प्रकरणाकडे गांभीर्याने बघत आहोत. क्राईम ब्रँच याचा तपास करत आहे . मुंबईकरांची कोणतीही क्षती होणार नाही, अशा शब्दात मुंबई शहराचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आश्वस्त केले.

शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वरळी येथील नियंत्रण कक्षातून मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर मजकूर संदेश प्राप्त झाल्याचे पोलिस आयुक्त फणसळकर यांनी यावेळी सांगितलं. विविध संदेशांतून पाठवणाऱ्याने २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर

१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?

कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट

निर्बंधमुक्त दहीहंडीमुळे गोविंदा घेतायत मोकळा श्वास

मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेला त्यांच्या हेल्पलाइन नंबरवर अनेक संदेश प्राप्त झाले आहेत. शहरात “२६/११ सारखा” हल्ला सहा जणांकडून केला जाईल आणि मुंबई शहर “उडवण्याची तयारी सुरू आहे असा मजकूर या संदेशात आहे. या धमकीनंतर मुंबई शहरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या धमकीनंतर मुंबईकरांमध्ये २६/११ च्या कटू आठवणी बरोबरच काहीसं भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर पोलिस आयुक्तांनी या धमकीनंतर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्याबरोबरच मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

या धमकी प्रकरणाच्या तपासासंदर्भात महाराष्ट्र एटीएसच्या आम्ही संपर्कात आहोत. त्यांना ही माहिती देण्यात आली आहे. ज्यांनी ज्यांनी मेसेज केले आहेत त्याचे सर्व अ‍ँगल तपासून बघण्यात येतील. चॅटवरील नंबर कुठले आहेत याचाही तपास करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी या क्रमांकाची पूर्व चौकशी केली आहे, असेही पोलीस आयुक्त फणसळकर म्हणाले. देशाच्या इतिहासातील २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या सर्वात भयंकर दहशतवादी हल्ल्यामध्ये १६६ लोक ठार झाले आणि ३०० हून अधिक जखमी होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा