सेक्स रॅकेट चालविणाऱ्या भोजपुरी अभिनेत्रीचा पर्दाफाश

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने केली कारवाई

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या भोजपुरी अभिनेत्रीचा पर्दाफाश

मुंबईत सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका भोजपुरी अभिनेत्रीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिचे नाव सुमन कुमारी असल्याचे कळते.

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या वतीने या धाडी टाकण्यात आल्या त्यात या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. रॉयल पाम हॉटेल, आरे कॉलनी भागात हे सेक्स रॅकेट चालत असल्याचे पोलिसांना कळले आणि त्यांनी तिथे छापेमारी केली असता हे सेक्स रॅकेट काही काळापासून सुरू असल्याचे आढळले.

पोलिसांनी हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी एक नाटक उभे केले. त्याठिकाणी पोलिसांनी सुमन कुमारी नावानेच एका ग्राहकाला पाठवले. या अभिनेत्रीचे नावही सुमन कुमारी असल्यामुळे ती जाळ्यात अडकली. तिने यासंदर्भात व्यवहार करण्याची तयारी दर्शविली. प्रत्येक मॉडेलमागे ५० ते ८० हजार रक्कम देण्याची तयारी दाखविल्यानंतर ती जाळ्यात सापडली.

हे ही वाचा:

तब्बल चार कोटींचे आयफोन लंपास!

भगवान परशुराम ब्राह्मतेज, क्षात्रतेजाचे प्रतीक

अहो, उद्धव ठाकरे, तुमची ब्लू टीक नऊ महिन्यांपूर्वीच गेली…

कृतयुग किंवा त्रेतायुगाचा प्रारंभ म्हणजे अक्षय (अक्षय्य) तृतिया

ही अभिनेत्री सध्या पोलिस कोठडीत आहे. या सेक्स रॅकेटमध्ये आणखी कोण आहेत त्यांची माहिती सध्या घेणे सुरू आहे. पोलिसांनी अशा प्रकारच्या संशयित हालचाली कुठेही दिसत असतील तर त्याची तातडीने माहिती देण्याची विनंती नागरिकांना केली आहे.

सुमन कुमारी ही २४ वर्षीय अभिनेत्री असून ती भोजपुरी मालिका, सिनेमा यात काम करते. ग्राहकांना मॉडेल्सचा पुरवठा करणे हे तिचे काम होते. मुंबईत चित्रपट उद्योगात स्थान मिळविण्यासाठी आलेल्या नवख्या मुलींना हेरून त्यांची पैशाची गरज भागविण्यासाठी त्यांना सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ओढण्याचे काम ही सुमन कुमारी करत असे. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना या धंद्यात आणण्याचे काम ती करत असे.

या सुमन कुमारीने अनेक भोजपुरी चित्रपटात काम केलेले आहे. लैला मजनू या चित्रपटात तिने काम केले आहे. तर बाप नंबरी बेटा दस नंबरी या भोजपुरी कॉमेडी शोमध्येही ती झळकली आहे. बूम ओटीटी चॅनेलमध्येही तिने काम केलेले आहे.

पोलिसांनी तिला अटक केली असून ती मुंबईत सहा वर्षे राहात आहे, पण तिने हे रॅकेट कधीपासून सुरू केले याची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही.

Exit mobile version