पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्याच्या मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जे जे रुग्णालय उडवण्याचीही धमकी

पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्याच्या मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. कामरान खान असे आरोपीचे नाव असून त्याला मुंबईतील सायन परिसरातून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या.

माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवणार असल्याचे त्याने म्हटले होते. तसेच त्याने मुंबईतील जेजे हॉस्पिटल उडवण्याचीही धमकी दिली होती. या धमकीनंतर खळबळ उडाली होती.

या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने धमकी देणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. बऱ्याच तपासानंतर आरोपी कामरान याला चुनाभट्टी परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या. मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी कामरान खान याच्याविरुद्ध भादंवि कलम ५०५(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आसून पोलिस त्याची कसून चौकशी करत अधिक तपास करत आहेत.

हे ही वाचा:

सुटकेस मध्ये सापडलेल्या महिलेच्या हत्येची उकल,प्रियकराला अटक!

कांदिवली पूर्व विधानसभेत छठ पूजा उत्सव उत्साहात

पुण्यात कोयता गँगची दहशत; पाठलाग करत इमारतीच्या छतावर तरुणाची हत्या

भारत पराभूत झाला, पण ऑस्ट्रेलिया का जिंकली?

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला केलेल्या कॉलदरम्यान कामराने याने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचेही नाव घेतले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवणार असल्याचे त्याने म्हटले. एवढेच नव्हे तर आपण, मुंबईतील जेजे हॉस्पिटलही उडवू, अशी धमकी देखील दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Exit mobile version