हाऊसकिपिंग करणाऱ्यानेच घर ‘साफ’ केले, २४ तासांत जेरबंद

हाऊसकिपिंग करणाऱ्यानेच घर ‘साफ’ केले, २४ तासांत जेरबंद

बारा वर्ष हाऊसकीपिंग मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या चोरट्याला कांदिवली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि ४६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बिहारच्या जमुई जिल्ह्यातून आरोपीला अटक करण्यात आली. चोरी करण्यासाठी आरोपींनी लॉकरच्या डुप्लिकेट चावीच्या मदतीने ही चोरी केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डीसीपी विशाल ठाकूर यांनी सांगितले की, २६ ऑक्टोबर रोजी कांदिवली पोलिस ठाण्यात तक्रारदाराच्या घरातून ४१ लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार आली होती. त्यानंतर कांदिवली पोलिसांनी एक टीम तयार केली आणि बिहारच्या जमुई जिल्ह्यातील श्रीकांत चिंतामणी यादव (३४) याला अटक केली. जमुई जिल्ह्यातील एसपी सौरी सुमन यांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असता, फिर्यादीच्या तक्रारीत ४१ लाखांचा समावेश होता. मात्र आरोपींकडून ४६ लाख ५० हजारांची ८ लाख ४६ हजारांची रोकड, महागडे घड्याळ, कॅमेरा, सोने, चांदीचे दागिने असा ३५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

आरोपी श्रीकांत यादव हा वास्तुविशारद कार्यालयात तसेच कांदिवली (पश्चिम) येथील महावीर नगर भागातील त्याच्या घरी हाऊसकीपिंग मॅनेजर म्हणून काम करत होता. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी एका कपाटाच्या चाव्या हरवल्या होत्या आणि त्यांच्या पत्नीने यादव यांना नवीन चावी बनवण्यास सांगितले होते असे या वस्तुवास्तुविशारदाने पोलिसांना सांगितले. २४ ऑक्टोबर रोजी वास्तुविशारदाने यादव यांना काही कामानिमित्त बोलावले होते. मात्र तो दिवाळीत सुट्टीवर गेला असल्याचे समजले. पण त्याच दिवशी संध्याकाळी आर्किटेक्टच्या पत्नीने कपाट तपासले असता ४१. ५० लाख रुपये किमतीचे सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी कांदिवली पोलिसांशी संपर्क साधला एफआयआर नोंदवण्यात आला.

हे ही वाचा:

नितेश राणेंचा मोर्चा आणि त्याच रात्री लागला मुलीचा शोध

संभाजी भिडेंनी पत्रकाराला सांगितले, आधी टिकली लाव मगचं बोलू

मुंबईत एका मुलीचे फुटपाथवरून अपहरण, दोन महिला अटकेत

राज्यातील बँकिंग घोटाळ्यांची होणार चौकशी

आरोपींनी कपाटातील मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी डुप्लिकेट चावीचा वापर केला असावा असा संशय आला. आम्ही बिहारमध्ये एक टीम पाठवली आणि बिहारमधील स्थानिक पोलिसांच्या मदतीने या चोराला २४ तासांच्या आत त्याला पकडले असे डीसीपी ठाकूर यांनी सांगितले.

Exit mobile version