लोकलमध्ये बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा फेक कॉल

आरोपीला विलेपार्लेतून अटक

लोकलमध्ये बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा फेक कॉल

मुंबईतील लोकलमध्ये सीरिअल बॉम्बस्फोट करण्यात येणार आहे, असा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आल्यानंतर मुबई पोलीस अलर्ट झाले. पोलिसांनी तत्काळ रेल्वे प्रशासनाला त्याची माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी तातडीने पावले उचलत फोन करणाऱ्या व्यक्तीला केवळ दोन तासात अटक केली. अशोक मुखिया (वय २५) असे संशयित आरोपीचे नाव आहे. रविवारी सकाळी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात हा फोन आला होता.    

फोन करणाऱ्या व्यक्तीने लोकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले असून सिरीयल बॉम्बस्फोट होणार आहेत, असे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. या नंबरवर पोलिसांनी लगेच फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र तो फोन बंद होता. पोलिसांनी तातडीने हि माहिती रेल्वे पोलिसांना दिली. फोन कोठून आला याची चौकशी सुरु केली. मोबाईल नंबरच्या आधारे आरोपीचे लोकेशन शोधले.

हे ही वाचा:

अतिक अहमद टोळीचा सदस्य इरफान हसन पोलिसांच्या ताब्यात

शह आणि मात की शह आणि माफ?

‘राहुल गांधी अजूनही दोषी’ देशाच्या सक्षमीकरणासाठी तरुणांनी योगदान द्यावे  

ग्रंथालयांचा विकास समाज आणि संस्कृतीशी निगडित

 

आरोपी जुहू परिसरात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जुहू पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली. मुखियाला जुहू पोलिसांनी विलेपार्ले येथील नेहरूनगर परिसरातून अटक केली. तो मुंबईतील एका हॉटेलमध्ये हेल्पर म्हणून काम करतो. तो मूळचा बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी आहे. या पूर्वीही मुखियाविरोधात बिहारमध्ये गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसचे पथकाही या प्रकरणाचा तपास करत आहे.

Exit mobile version