28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाधक्कादायक! महिला अत्याचारांमध्ये मुंबईचा क्रमांक दुसरा

धक्कादायक! महिला अत्याचारांमध्ये मुंबईचा क्रमांक दुसरा

Google News Follow

Related

मुंबईत सध्याच्या घडीला साकीनाका घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला. या घटनेमुळे मुंबईसारख्या शहरात आता महिला खरोखरच सुरक्षित आहेत का हा प्रश्न जाहीरपणे विचारला जात आहे.

त्यातच दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून देशातील गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर करणारा अहवाल तयार केला जातो. २०२० या वर्षासाठीचा हा अहवाल जाहीर झाला असून त्यानुसार २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये अर्थात कोरोनाच्या काळात महिलांविरोधातील नोंद गुन्ह्यांचं प्रमाण ८.३ टक्क्यांनी घटलं आहे. मात्र, असं असलं, तरी याच काळात पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये मात्र हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून येत आहे. तसेच, देशभरातील आकडेवारीमध्ये सर्वाधिक प्रमाण पती किंवा इतर कुटुंबीयांकडून करण्यात येणाऱ्या अत्याचारांच्या गुन्ह्यांचं असल्याचं देखील या आकडेवारीवरून समोर आलं आहे.

एनसीआरबीच्या अहवालानुसार महिला अत्याचारात पहिल्या वीस शहरांमध्ये राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. तसेच लोकसंख्येच्या तुलनेने मुंबईचा महिलांसंबंधित गुन्हे दर ५३.८ टक्के इतका आहे. बलात्कारानंतर हत्या होण्याचे प्रमाणही जास्त आहे. तसेच २०१९ मध्ये महाराष्ट्रात ८०८ महिला तरुणींनी दबावाला बळी पडून आत्महत्या केल्या होत्या हेही अहवालाच्या माध्यमातून आता समोर आलेले आहे. लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार नोंद गुन्ह्यांमध्येही महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा आहे.

हे ही वाचा:

कोरोना लस घेतलेल्यांना रेल्वे तिकिट का नाही?

२१ दिवस क्वारंटाईन करूनही चीनमध्ये कोरोना कसा?

भूपेंद्र पटेल सरकारमध्ये सर्व नवीन चेहऱ्यांना संधी

स्वातंत्र्यवीर सावरकर नव्हे, नेहरूच होते माफीवीर!

१४ सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या एनसीआरबीच्या (NCRB Report) अहवालानुसार २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये महिलांविरोधात नोंद होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये ८.३ टक्के घट झाल्याचं दिसून आलं आहे. २०१९मध्ये हा आकडा ४ लाख ५ हजार ३२६ इतका होता, २०२०मध्ये तो ३ लाख ७१ हजार ५०३ इतका खाली आला आहे. मात्र, असं असताना पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये हे प्रमाण आधीच्या वर्षाच्या तुलनेत वाढलं आहे.

त्याउलट देशाची राजधानी दिल्लीमध्ये महिलांविरोधातील नोंद गुन्ह्यांमध्ये घट दिसून येत आहे. दिल्लीत २०१९मध्ये १३ हजार ३९५ गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर २०२०मध्ये ती १० हजार ०९३ इतकी खाली आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील हे प्रमाण ५९ हजार ८५३ वरून ४९ हजार ३८५ इतकं खाली आलं आहे. त्यामुळे करोना काळात महिलांविरोधात नोंद होणाऱ्या गुन्ह्यांचं सरासरी प्रमाण घटल्याचं स्पष्ट झालं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा