नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मुंबई पोलिसांना धमकीचा फोन!

मुंबई हाय अलर्टवर

नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मुंबई पोलिसांना धमकीचा फोन!

देशभरात नवीन वर्षाची जय्यत तयारी सुरू आहे. उत्सवाची जय्यत तयारी पाहता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. नवीन वर्ष मोठ्या थाटामाटात साजरे करणाऱ्या शहरांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनीही सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. त्यानंतर पोलिसांनी या कॉलरचा शोध सुरू केला आहे.

शनिवारी संध्याकाळी मुंबई पोलिस कंट्रोलला धमकीचा कॉल आला, ज्यामध्ये कॉलरने दावा केला की मुंबईत बॉम्बस्फोट होणार आहेत आणि असे सांगितल्यानंतर कॉलरने कॉल डिस्कनेक्ट केला. या कॉलनंतर सर्व पोलीस ठाणी आणि गुन्हे विभागांना सतर्क करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

ठाण्यात रेव्ह पार्टी उधळली; १०० तरुणांना घेतलं ताब्यात

गोव्यात काँग्रेस, ‘आप’ला सनातन धर्माची चिंता!

दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कराच्या ताफ्यात आणखी ५० अरमाडो वाहने

विनेश फोगटने अर्जुन, खेल रत्न पुरस्कार कर्तव्य पथावर सोडले!

मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे की, शनिवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा फोन आला होता, त्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी तपास केला, मात्र अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. पोलिस सध्या फोन करणाऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान,मुंबई पोलिसांकडून मुंबईत ठिकठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी समुद्रकिनारी देखील सुरक्षा वाढवली आहे. नवीन वर्ष संपूर्ण शहरात शांततेत साजरे व्हावे यासाठी मुंबई पोलिसांनी समुद्रकिनारी सुरक्षा वाढवली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत २० डिसेंबर २०२३ ते १८ जानेवारी २०२४ या कालावधीत कलम १४४ लागू करण्यात आली आहे.

 

Exit mobile version