27 C
Mumbai
Thursday, November 28, 2024
घरक्राईमनामागाईच्या हत्येप्रकरणी नईम कुरेशीला अटक!

गाईच्या हत्येप्रकरणी नईम कुरेशीला अटक!

काशीगाव पोलिसांची कारवाई

Google News Follow

Related

गाईची हत्या केल्याप्रकरणी काशीगाव पोलिसांनी मिरा रोड भागातून नईम सैफ कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला बुधवारी अटक केली. आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसह ईदच्या आधी गोवंश जातीच्या प्राण्याची हत्या केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी नईमला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र, कत्तलीदरम्यान आरोपींसोबत असलेले अन्य दोन साथीदार ९ एप्रिलच्या रात्री पोलिस येत असल्याचे पाहून तेथून पळून गेले. या प्रकरणी भारतीय दंड संहिता, १८६०च्या कलम ४२९ आणि ३२ आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, १९७६च्या कलम ५ सी, ९ ए, ९ बी आणि प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा, १९६०च्या कलम ३ आणि ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

ऑनलाइन शेअर ट्रेडिंग फसवणुकीचे रॅकेट उघडकीस!

विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी; रब्बी, उन्हाळी पिकांचे नुकसान

मध्य पूर्वेकडील देशांवर युद्धाचे सावट

सहा विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर हरयाणा शाळेला नोटीस

ही घटना ९ एप्रिल रोजी रात्री घडली. काशीगाव पोलिस ठाण्याच्या हवालदारांना मुंबईतील मिनाक्षी नगर भागात कत्तलीची घटना घडत असल्याची माहिती मिळाली होती. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना गुरांच्या कातड्याचे अवशेष आणि रक्त आढळून आले. पोलिसांना अवशेषांच्या आसपास एकूण तीन पुरुष दिसले. मात्र पोलिस हवालदार जवळ येत असल्याचे पाहून तिघांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यातील दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले, तर पोलिसांनी एका आरोपीला पकडले. त्याचे नाव नईम कुरेशी असे आहे.चौकशीत आरोपीने इतर दोन आरोपींची ओळख पटवण्यास नकार दिला.

पोलिसांनी घटनास्थळावरून चाकूसारखे एक मोठे हत्यार, एक जाड दोरखंड आणि गुरांची कातडीही जप्त केली आहे. त्यामुळे घटनास्थळी कत्तलीसारखा प्रकार झाला असावा, याला दुजोरा मिळतो आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताचे नमुने जमा केले असून ते पुढील तपासासाठी पाठवले आहेत. काशीगाव पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले हवालदार चैतन्य नरळे यांनी याबाबतची पोलिस तक्रार केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा