मुंबईतल्या एका व्यावसायिकाची तीन कोटी तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.युक्रेन येथे वास्तव्यास आहे असे सांगून एका महिलेने युक्रेन मधून भारतात व्यवसाय करण्यासाठी युक्रेन मधून पैशांचा बॉक्स पाठवत असल्याचे सांगत केली फसवणूक.पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
मुंबईतल्या एका ७५ वर्षीय व्यावसायिकाने आपली फसवणूक झाल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.तक्रारदार एका खाजगी कंपनीचा मालक आहे. व्यावसायिकाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, एसेमा नावाच्या एका महिलेने ईमेलद्वारे संपर्क केला होता.आरोपी एसेमा ही युक्रेनची रहिवासी असल्याचे सांगत भारतात तिला व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते.युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तिच्या व्यवसायाचे नुकसान झाले असून तिला आता भारतात पाऊल टाकायचे आहे, असे तक्रारीत नमूद केले आहे.
सुरवातीला स्कॅमरने त्याच्या कंपनीकडून मशिनरी उपकरणे खरेदी करण्याबद्दल चौकशी केली,नंतर आपल्या व्यवसायात भागीदारीचा प्रस्ताव त्याला दिला.या भागीदारीचा एक भाग म्हणून महिलेने व्यावसायिकाला $९.७ लाख रोख असलेला बॉक्स पाठवण्याचे वचन दिले, याची भारतीय किंमत ८ कोटी रुपये इतकी आहे.व्यावसायिकाने व्यवसायासाठी सहमती दर्शवली आणि आपले संभाषण मेलद्वारे चालू ठेवले.त्यानंतर व्यावसायिकाला ई-मेलद्वारे एक आयडी प्राप्त झाला.एसेमाकडून पाठवण्यात येणाऱ्या $९.७ लाख रुपयांच्या बॉक्सचा ट्रॅकिंग आयडी क्रमांक देखील त्याला मिळाला.
हे ही वाचा:
आयपीएस अधिकाऱ्यासह तीन पोलिसांवर विभागीय कारवाईचे निर्देश
आरक्षणाला विरोध करणाऱ्या तरुणाला मराठा आंदोलकांकडून चोप
झोपण्याची दोन इंच जागा कमी झाल्याने कैद्यांची न्यायालयात धाव
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११ निर्णयांना मान्यता!
मात्र, काही दिवसानंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले.एसेमाकडून पाठवण्यात आलेला पैशांचा बॉक्स जकार्ता येथे इंडोनेशियन अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची माहिती व्यावसायिकाला फोनद्वारे मिळाली.पैशांचा बॉक्स मिळवण्यासाठी व्यावसायिकाला विविध शुल्क भरण्याची सूचना या कॉलद्वारे देण्यात आल्या.त्यानंतर व्यावसायिकाने सूचनांचे पालन करत वेगवेगळ्या अशा १०१ खात्यांवर पेमेंट केले, विशेष म्हणजे ही खाती सर्व भारतातील होती.
व्यावसायिकाला वारंवार पैसे पाठवण्याचे ईमेलद्वारे सांगितले जात होते.व्यावसायिकाने आठ महिन्याच्या कालावधीत तब्बल ३.३ कोटी रुपये स्कॅमरला पाठवले होते.भारतीय चलनानुसार ८ कोटी रुपये मिळतील या आशेपोटी व्यावसायिकाकडून ३.३ कोटी रुपये पाठवण्यात आले परंतु त्याला काहीच मिळाले नाही.आपली फसवणूक झाल्याचे कळताच व्यावसायिकाने आपले संभाषण बंद केले व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.