कुर्ला येथे सुटकेस मध्ये मृत अवस्थेत मिळून आलेल्या महिलेच्या हत्येची उकल करण्यास मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष ५ आणि कक्ष ११च्या पथकाने धारावी येथून एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला इसम हा मृत महिलेचा प्रियकर असून दोघे लग्नाशिवाय एकत्र धारावी परिसरात राहण्यास होते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
कुर्ला पोलिसांना रविवारी सीएसटी रोड वरील शांती नगर समोर मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी बेवारस सुटकेस मिळून आली होती.या सुटकेसमध्ये एका महिलेचा दुमडलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. प्राथमिक तपासावरून या महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह सुटकेस मध्ये बंद करून सुटकेस मेट्रो कामाच्या ठिकाणी फेकण्यात आल्याचे निष्पन्न झाले, याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून मृतदेहाची ओळख पटविण्यात येत होती. मृतदेह बघून ही हत्या २४ तासापूर्वी करण्यात आल्याचे तपासात समोर आले.
हे ही वाचा:
कांदिवली पूर्व विधानसभेत छठ पूजा उत्सव उत्साहात
पुण्यात कोयता गँगची दहशत; पाठलाग करत इमारतीच्या छतावर तरुणाची हत्या
भारत पराभूत झाला, पण ऑस्ट्रेलिया का जिंकली?
गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयाखाली सापडला ५५ मिटरचा बोगदा
मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसानी महिलचे छायाचित्र व्हायरल व्हाट्सएपवर केले होते. तसेच मुंबईतील पोलीस ठाण्याकडून हरवलेल्या महिलाची माहिती मागविण्यात आली होती.व्हाट्सअपवर व्हायरल झालेल्या छायाचित्रावरून धारावीत राहणाऱ्या एका महिलेने गुन्हे शाखा कक्ष ५च्या अधिकारी यांना संपर्क साधून मृत महिला तिची बहीण असून ती मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगितले.पोलिसानी धारावीत राहणाऱ्या महिलेचा जबाब नोंदवून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली.
मृत महिला आणि तिचा प्रियकर हे दोघे ओरिसा राज्यातील राहणारे असून मागील काही वर्षांपासून दोघे लग्न न करता धारावी परिसरात राहण्यास होते अशी माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी मृत महिलेच्या प्रियकराचा शोध घेऊन तो ओरिसाला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला लग्नासाठी तगादा लावत असल्यामुळे त्याने प्रेयसीची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा हेतूने मृतदेह सुटकेस मध्ये टाकून सुटकेस कुर्ला परिसरात फेकल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.