मुंबई शहर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना आता शहरावर नवे संकट घोंगावत आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ३१ डिसेंबरला दहशतवाद्यांकडून मुंबई शहराला धोका असल्याची गुप्त माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून शहरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याचे राजधानीचे शहर असलेले मुंबई हे दहशतवाद्यांच्या नेहमीच निशाण्यावर असते. मुंबई खालिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची गुप्त माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली आहे. या मिळालेल्या माहितीनुसार शहरात पोलीस बंदोबस्त वाढवला असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करून त्यांना तातडीने ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
महाराष्ट्राच्या महिला कडाडल्या तर पुरुषांमध्ये रेल्वे धडाडली
महाराष्ट्राचा किशोर संघ उपांत्यपूर्व फेरीत; आता राजस्थानला भिडणार
ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट!!! लागू केली ‘ही’ नवी नियमावली
देशात आणि राज्यात ओमिक्रोनने घेतला पहिला बळी
या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्हसारख्या प्रमुख ठिकाणी होणारी लोकांची गर्दी लक्षात घेऊन चोख पोलिस बंदोबस्त केला आहे. तसेच मुंबईतील महत्त्वाच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.