अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी नरेश गौर याला मिळालेल्या जामिनाविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आव्हान केले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने हे आव्हान फेटाळले आहे.
नरेश गौरच्या जामीनाला एनआयएने आव्हान केले होते. नरेश गौरला ८ डिसेंबरला जामीन मंजूर झाला होता. एनआयए कोर्टाने आरोपी नरेश गौर याला जामीन मंजूर केला होता. मात्र, त्या आदेशाला २५ दिवसांची स्थगिती दिली होती. या स्थगितीला गौरने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. नंतर एनआयएने केलेले आव्हान उच्च न्यायालयाने फेटाळले आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर महिन्याभराने बुकी नरेश गौरच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
हे ही वाचा:
ती म्हणते लाल किल्ला माझा, मला द्या!
बड्या धेंडांकडून १३ हजार कोटी वसूल
पेपरफुटी प्रकरणी आणखी एक पोलिसांकडे ‘डेरे’दाखल
एअर ऍम्ब्युलन्समध्ये ओदिशाचा पहिला नंबर
नरेश गौर याला अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणात कथित सहभागामुळे अटक करण्यात आली होती. गौरवर मोबाईल सिम पुरवठा करणे आणि कटात सहभागी होण्याचा आरोप आहे. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.
२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवलेली एक गाडी आढळली होती. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले होते.