१३ कोटींच्या गोळ्या गिळणाऱ्याला विमानतळावर केली अटक

मुंबई विमानतळावर करण्यात आली कारवाई

१३ कोटींच्या गोळ्या गिळणाऱ्याला विमानतळावर केली अटक

गणेशोत्सवादरम्यान मोठी कारवाई करताना मुंबई विमानतळावरून १३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने अटक केलेल्या व्यक्तीच्या पोटातून ड्रग्जच्या ८७ कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने कोकेनचा समावेश असण्याची शक्यता आहे.

प्रवाशाकडून जप्त करण्यात आलेल्या १,३०० ग्रॅम कोकेनची किंमत १३ कोटी रुपये आहे, असे मुंबई सीमा शुल्क विभागाने सांगितले. अटक करण्यात आलेली व्यक्ती ही घाना येथील असल्याचं समजतं. या प्रवाशाला २८ ऑगस्ट रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संशयास्पदरित्या अडवण्यात आले. झडतीदरम्यान अधिकाऱ्यांना त्याच्या सामानात काहीही सापडले नाही, मात्र तपासादरम्यान त्याने ८७ कॅप्सूल गिळल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले.

हे ही वाचा:

केजरीवाल विसरले ती लिकर पॉलिसी

नवे नौदल चिन्ह, मोदी आणि पिवळे इतिहासकार

‘एनआयए’ने दाऊद इब्राहिमची लायकीच काढली

‘राज साहेब आपल्या परखड वक्तृत्वाची महाराष्ट्र वाट पाहतोय’

त्यानंतर त्याला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्या पाेटातून तीन दिवसांपासून लपवून ठेवण्यात आलेल्या कॅप्स्युल बाहेर काढण्यात आल्या. या प्रवाशाला नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्याच्या (एनडीपीएस) संबंधित कलमांतर्गत अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. या कारवाईनंतर मुंबई विमानतळावरील सुरक्षा आणि तपासणीही कडक करण्यात आली आहे.

या आधी मागील महिन्यातही सीमाशुल्क विभागाने सिएरा लिओन या महिलेला अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली हाेती. या महिलेला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. सीमाशुल्क अधिकार्‍यांनी तिच्याकडून ५ कोटी रुपयांचे ५०० ग्रॅम कोकेन जप्त केले हाेते. इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानाने ही महिला अदिस अबाबाहून मुंबईत आली होती.

Exit mobile version