गीतकार जावेद अख्तर यांना याबद्दल बजावले मुंबई न्यायालयाने समन्स

गीतकार जावेद अख्तर यांना याबद्दल बजावले मुंबई न्यायालयाने समन्स

ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांच्याविरोधात मुंबई न्यायालयाने समन्स बजावले आहे. जावेद अख्तर यांनी गेल्या वर्षी मध्ये एका टीव्ही मुलाखतीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध वकील संतोष दुबे यांनी फिर्याद दिली होती.

जावेद अख्तर यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आरएसएसवर टिप्पणी केली होती. त्यानंतर, अधिवक्ता संतोष दुबे यांनी ऑगस्टमध्ये जावेद अख्तर विरुद्ध उपनगरीय मुलुंड येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयामध्ये मानहानी, बदनामी अंतर्गत तक्रार दाखल केली होती. जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत आरएसएसची तुलना तालिबानशी केली होती. आरएसएसला पाठिंबा देणाऱ्यांची मानसिकता तालिबानसारखीच आहे. आरएसएसला पाठिंबा देणाऱ्यांनी आरएसएस आणि तालिबानमध्ये काय फरक आहे याकडे लक्ष द्यावे असे ते म्हणाले होते.

जावेद अख्तर यांनी राजकीय फायद्यासाठी आरएसएसचे नाव जाणूनबुजून वादात ओढण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. आरएसएसला बदनाम करण्यासाठी त्यांनी असे वक्तव्य केले आहे. ज्यांना संघात यायचे आहे, त्यांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न जावेद अख्तर यांनी केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणातील संक्षिप्त युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि रेकॉर्डवरील कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर, महानगर दंडाधिकारी पीके राऊत यांनी अख्तर यांना समन्स बजावले. अख्तर ज्या तारखेला न्यायालयात हजर होणार होते त्या तारखेपर्यंत या प्रकरणाची सुनावणी ६ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हे ही वाचा:

१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!

पश्चिम रेल्वेच्या सेवेत ‘यात्री ॲप’

महिला क्रिकेट सामन्यांत प्रेक्षकांनीच केला विक्रम

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ महत्त्वाचे निर्णय झाले

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले होते, “जेव्हा एका (मुस्लिम) पुरुषाला एकावेळी एकापेक्षा जास्त बायका ठेवण्याचा अधिकार आहे, तर मग महिलांना का नाही. त्यांनी याला समानतेच्या विरोधात म्हटले. यानंतर लखनऊमधील ऑल इंडिया शिया चांद कमिटीचे अध्यक्ष मौलाना सय्यद सैफ अब्बास नक्वी यांनी जावेद अख्तर यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

Exit mobile version