संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

सुनावणी २४ जानेवारीपर्यंत तहकूब

संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

मुंबईतील विशेष दंडाधिकारी न्यायालयाने खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांनी राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. संजय राऊत यांचे वकील सनी जैन यांनी मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीत हजर राहण्यापासून सूट मिळावी असा अर्ज दाखल केला होता.

सोमय्या यांचे वकील लक्ष्मण काल आणि विवेकानंद गुप्ता यांनी अर्जाला विरोध केला आणि सांगितले की राऊत कधीही ट्रायल कोर्टात हजर झाले नाहीत. न्यायालयाने यापूर्वी ४ जुलै २०२१ रोजी संजय राऊत विरुद्ध ५,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. याआधी संजय राऊत ऑगस्टमध्ये तुरुगातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी आपण दोषी नसल्याचे त्यांनी सांगितले होते. , न्यायदंडाधिकारी पीआय मोकाशी यानी युक्तिवाद ऐकल्यानंतर राऊत यांनी दाखल केलेला सूट अर्ज फेटाळून लावत हजर राहण्याचे निर्देश दिले.

हे ही वाचा:

योगी आदित्यनाथ यांच्या भेटीमुळे मविआ नेत्यांची पोटदुखी वाढली

अयोध्येत उभे राहणार ‘महाराष्ट्र भवन’

उत्तर भारतीय जनतेच्या द्वेषावर काँग्रेस फोफावली; आदित्यनाथांच्या भेटीवरून राजकारण

अजित पवार यांची वैचारिक उंची कळली

मेधा सोमय्या न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाल्या. यावेळी किरीट सोमय्या हेही न्यायालयात हजर होते. कोट्यवधी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा खोटा आरोप करून संजय राऊत यांनी आपली बदनामी केली आहे असे राऊत यांनी न्यायालयाला सांगितले.संजय राऊत यांनी मुंबईजवळील मीरा भाईंदर परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या बांधकाम आणि देखभालीशी संबंधित १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आपण आणि आपले पती गुंतल्याचा निराधार आणि बदनामीकारक आरोप केल्याचा दावा करत मेधा सोमय्या यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मेधा यांनी राऊत यांच्यावर कलम ४९९ आणि ५०० (मानहानी) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.शिवडी महानगर दंडाधिकाऱ्यांनी हे वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने तक्रारदाराचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर सुनावणी २४ जानेवारीपर्यंत तहकूब केली.

Exit mobile version