मुंबईतील व्यापाऱ्याला घरात ओलीस ठेवून ५५ लाखांचा ऐवज केला लंपास!

मुंबईतील काळबादेवी परिसरातील घटना

मुंबईतील व्यापाऱ्याला घरात ओलीस ठेवून ५५ लाखांचा ऐवज केला लंपास!

दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला त्याच्या राहत्या घरातच कोंडून त्याच्या तिजोरीतून ५५ लाख रुपयांची चोरी झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालबादेवी येथील आदित्य हाईट्समध्ये ही घटना घडली, जिथे व्यापारी आपल्या राहत्या घरी एकटाच होता तेव्हा चार अज्ञात व्यक्तींनी एकाच वेळी आवारात प्रवेश करत व्यापाऱ्याला लुटले.

ही घटना रविवारी घडली.पोलिसांनी देलेल्या माहितीनुसार, आदित्य हाईट्समध्ये राहणाऱ्या व्यायसायिकाला चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली.त्यांनतर त्याला ओलीस ठेवले, त्याच्या घरातील तिजोरीत रोख रक्कम आणि दागिने असा ५५ लाख रुपयांचा ऐवज चोरटयांनी लंपास करत घरातून पळ काढला.याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. व्यावसायिकाच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा :

मध्य प्रदेशात भाजपाचे धक्कातंत्र; शिवराजसिंह चौहानांऐवजी मोहन यादवांची मुख्यमंत्रीपदी वर्णी

सर्वोच्च न्यायालयाच्या ३७० संबंधीच्या निर्णयाचा बॉलीवूडला आनंद

शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या नरभक्षक वाघाला पकडा अन्यथा ठार करा!

पाकच्या बॉर्डरवर तेजस विमाने चुटकीसरशी पोहोचणार!

या प्रकरणात, एलटी मार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध कलम ४५४, ३९२, ३४१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने अधिकारी संशयितांचा पाठलाग करत आहेत.पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version