मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणाऱ्या सोने तस्करीत दुपटीने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सोने तस्करीसाठी ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांचा तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, अशी धक्कादायक माहिती मुंबई कस्टम विभागाने उघडकीस आणली आहे. जुलै महिन्यात एकूण ४२ प्रकरणे दाखल झाली आहेत. यामध्ये सीमा शुल्क विभागाच्या गुप्तचर यंत्रणेने कारवाया केल्या आहेत.
भारत सरकारने सोन्याच्या आयातीवर निर्बंध लादल्याने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सोने तस्करीत दुपटीने वाढ झाल्याचे उघडकीस आले आहे. जुलै महिन्यात सोने तस्करीचे एकुण ४२ गुन्हे नोंदवले आहेत. तसेच दर महिन्याला सोने तस्करीच्या २०-२५ प्रकार उघडकीस येतात. परंतु जुलै २०२२ मध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सोन्याच्या आयातीवर ३ टक्क्याहून १५ टक्क्यापर्यंत वाढ झाली असून, सीमा ओलांडून सोन्याची तस्करी करण्याचे प्रमाण वाढू लागले आहेत. बहुतांश सोने तस्करी ही, मध्य पूर्वेतून होत असते. असें सूत्रांचे मत आहे.
हे ही वाचा:
संजय राऊत यांची कोठडी ४ दिवस वाढली
टोलसंबंधी नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा
७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे गाणे अमिताभ, सोनू निगम, विराटच्या मुखी
चोरांनी वृद्धाला लुटले पण पोलिसांना धडकले
सीमा शुल्क विभागाच्या गुप्तचर यंत्रणेने २३ जुलै रोजी २५ वर्षीय तरुणाला ५३७ ग्राम सोन्याची तस्करी केल्याबद्दल अटक केली आहे. ही तस्करी दुबईमार्गे मुंबई विमानतळावर करण्यात आली होती. तस्करी केलेल्या सोन्याची बाजारातील किंमत सुमारे २५ लाख रुपये एवढी आहे. अशाच पद्धतीने जून मध्ये सुद्धा दुबईहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या ३ परदेशी नागरिकांकडून १० कोटी रुपयांचे सोने तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या शिवाय आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडू येथून तस्करीमार्गे सोने मुंबईत आणले जाते. दक्षिणीकडे समुद्रमार्गे सोने तस्करी करून नंतर ते विमानाने मुंबईत आणण्याचा प्रयत्न करताना आढळले आहे. या संबंधित प्रकरणांमध्ये सीमा शुल्क विभागाच्या गुप्तचर यंत्रणेने तस्करांना अटक केली आहे.