मुख्तारचा एक मुलगा तुरुंगात, दुसरा जामिनावर बाहेर; पत्नीवरही ७५ हजारांचे बक्षीस

कुटुंबातील अनेक सदस्य सध्या फरार

मुख्तारचा एक मुलगा तुरुंगात, दुसरा जामिनावर बाहेर; पत्नीवरही ७५ हजारांचे बक्षीस

कैदेत असलेला कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कुटुंबात स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा असूनही त्याने गुन्हेगारी मार्ग चोखळला. आता त्याचे कुटुंबही याच मार्गाने चालत आहे. आजोबा स्वातंत्र्यसैनिक, वडील डाव्या पक्षांचे नेते मुख्तार अन्सारी याचे आजोबा डॉ. मुख्तार अहमद अन्सारी स्वातंत्र्यसैनिक होते. ते १९२६-२७ दरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि नंतर मुस्लिम लीगचे अध्यक्षही होते. ते महात्मा गांधी यांचे निकटवर्तीय होते. जेव्हा फाळणी झाली तेव्हा त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य पाकिस्तानला गेले.

डॉ. मुख्तार अन्सारी यांचा मुलगा सुब्हानउल्लाह अन्सारी देशातील मोठे डावे नेते होते. त्यांनी बेगम राबिया यांच्याशी विवाह केला. त्यांना तीन मुले झाली. सिबकतुल्लाह अन्सारी, अफजल अन्सारी और मुख्तार अंसारी १. सिबकतुल्लाह अन्सारी : हा दोनवेळा आमदार झाला आहे. सन २०१२मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकिटावर आणि सन २०१७मध्ये कौमी एकता दलाच्या तिकिटावर त्याने निवडणूक जिंकली होती. याचा मुलगा सुहेब उर्फ मन्नु अन्सारी याने यंदा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर मोहम्मदाबाद विधानसभा जागा जिंकली आहे.

२. अफजल अन्सारी : माकप पक्षाच्या वतीने पाचवेळा आमदार म्हणून तर दोनवेळा खासदार म्हणून निवडून आला आहे. सन २००४मध्ये सपाच्या तिकिटावर त्याने लोकसभा निवडणूक जिंकली होती. तर, सन २०१९मध्ये बसपाच्या तिकिटावर तो जिंकला. आता त्याला चार वर्षांची शिक्षा झाली आहे. त्याला तीन मुली आहेत.

 

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशातील तुरुंग बनले गुन्हेगारांचे कब्रस्तान

कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशात १४४ लागू

मुंबई इंडियन्सला सचिन तेंडुलकरचा गुरुमंत्र

दक्षिण आफ्रिकेतील बस अपघातात ४५ प्रवासी ठार

 

३. मुख्तार अन्सारी: तीन भावांमध्ये सर्वांत धाकट्या असलेल्या मुख्तारने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. मुख्तार अन्सारीच्या पत्नीचे नाव अफशां अन्सारी आहे. तिच्यावरही अनेक खटले दाखल आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्यावर ७५ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. ती अनेक वर्षांपासून फरार आहे. अफशां और मुख्तार यांना अब्बास आणि उमर अशी दोन मुले आहेत.

४. अब्बास अन्सारी : त्याने सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रतिनिधित्व करून उत्तर प्रदेशातील मऊ येथून २०२२मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्याने निशाणेबाजीत तीनवेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे आणि अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारतीय संघासोबत सहभागी झाला आहे. अब्बासला एक मुलगा आहे. अब्बास सध्या तुरुंगात आहे.

५ उमर अन्सारी : २४व्या वर्षीच उमर अन्सारी हा पोलिसांच्या निशाण्यावर आहे. त्याच्यावर द्वेषाने प्रेरित भाषण दिल्याबद्दल जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. ते सर्व फरार आहेत. त्याला आलिशान गाड्यांची हौस आहे.

Exit mobile version