मुख्तार अन्सारीला १० वर्षाची सजा

आमदार मुख्तारची रवानगी थेट तुरुंगात

मुख्तार अन्सारीला १० वर्षाची सजा

उत्तर प्रदेशातील बाहुबली मुख्तार अन्सारी याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. जबरदस्तीने जमीन बळकावल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. यापूर्वी ईडीने मुख्तार अन्सारीचा मुलगा अब्बास याला अटक केली असून, ईडीने अन्सारी कुटुंबातील अनेकांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांची चौकशी सुद्धा केली. आता ईडीने मुख्तार अन्सारी यांच्यावर कारवाई केली असून. अन्सारी व त्याचा साथीदाराला १०-१० वर्षाची शिक्षा सुनावली आहे व ५-५ लाख रुपयांचा दंड प्रयागराज न्यायालयाने ठोठावला आहे.

मुख्तार अन्सारी यांला ताब्यात घेऊन ईडीने विडियो कॉन्फररसिंगच्या माध्यमातून त्याची चौकशी केली. तपास यंत्रणेने अगोदरच वॉरंट जारी केले असून, त्यानंतर बांदा तुरुंगातून मुख्तारला प्रयागराज न्यायालयात हजर केले गेले. ईडीने मुख्तार अन्सारीची चौकशी करण्यासाठी विशेष न्यायालयाकडे दोन आठवड्यांची कोठडी मागितली होती. ईडीचे अधिकारी आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी मुख्तार अन्सारीची चौकशी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच मुख्तार आणि त्याच्या साथीदारांनी ३ ऑगस्ट १९९१ रोजी बनारसमध्ये माजी आमदार अजय राय यांचा भाऊ अवधेश राय यांची हत्या केली. यानंतर १९९६ मध्ये या प्रकरणाच्या तपासादरम्यान गाझीपूर पोलिसांनी या हत्येबद्दल आरोपींवर गुन्हा दाखल केला होता.

हे ही वाचा:

‘दोन बहिणीचं एकाच मुलाशी लग्न म्हणजे हिंदू संस्कृतीला काळिमा’

माजी राष्ट्राध्यक्ष कॅस्टिलो यांना तुरुंगात टाकल्यानंतर पेरूमध्ये आणीबाणी

अमित शहांचा सल्ला, ‘सीमाभागावर दावे नकोत’

धक्कादायक! दहा ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन

ईडीने २०२१ मध्ये मनी लाँड्रिंग विरोधात मुख्तार अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्येच बांदा तुरुंगात मुख्तार अन्सारीची चौकशी केली आणि मुख्तार अन्सारीचा जबाब नोंदवला. एवढेच नाही तर ईडीने अन्सारी कुटुंबातील अनेकांची चौकशीही केली आहे. ज्यामध्ये मुख्तारची दोन्ही मुले, भाऊ अफजल अन्सारी आणि पुतण्या यांची चौकशी करण्यात आली आहे. मुख्तार अन्सारी यांचा मुलगा अब्बास अन्सारी चित्रकूट आणि त्याचा मेहुणा नैनी मध्यवर्ती कारागृहात असून, मनी लाँड्रिंग प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. हत्या आणि मनी लाँड्रिंग विरोधात मुख्तार अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल असून त्याच दरम्यान सुनावणीसाठी कडेकोट सुरक्षितेत न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Exit mobile version