मुख्तार अन्सारी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

कुख्यात गुंड आणि बहुजन समाज पक्षाचा आमदार असलेल्या मुख्तार अन्सारीला पुन्हा एकदा उत्तर प्रदेशत आणले जात आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश पोलीसांची मोठी तुकडी पंजाब वरून त्याला घेऊन निघाली आहे.

मुख्तार अन्सारी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून पंजाबच्या तुरुंगात असलेला कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याला उत्तर प्रदेशात आणण्यासाठी सोमवारी युपी पोलिसांची एक टीम निघाली होती. या टीमने पंजाब पोलिसांकडून मुख्तार अन्सारीचा ताबा घेतला आहे. मुख्तारला उत्तर प्रदेशातील बांदा येथे आणण्यात येणार आहे.

कुख्यात गुंड आणि बहुजन समाज पक्षाचा आमदार मुख्तार अन्सारी याला पंजाबच्या तुरुंगातून उत्तर प्रदेशात आणण्यासाठी युपी पोलिसांची एक विशेष टीम सोमवारी रवाना झाली होती. त्याच्यावर राज्यात विविध प्रकारचे ५२ खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी १९ खटल्यांचा अजून तपास चालू आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये राज्य आलंय की उद्धव ठाकरे यांच्यावर राज्य आलंय?

राज्य सरकारने ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दार

बडे बेआबरु होकर निकले तेरे कुचे से

मुख्तार अन्सारीला २०१९ सालच्या एका खंडणी वसूल करण्याच्या केसमध्ये पंजाबमधील जेलमध्ये ठेवण्यात आले होते. या केसमुळे जानेवारी २०१९ सालापासून मुख्तार अन्सारी पंजाबमधील जेलमध्ये आहे. पंजाबचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (तुरूंग प्रशासन)   प्रविण कुमार सिन्हा यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार मुख्तार अन्सारीला उत्तर प्रदेश पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.

यापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांची एक टीम, विशेष पोलिसी गाड्या, अँब्युलन्स यांच्यसह पंजाबमध्ये पोहोचले आहेत. उत्तर प्रदेश पोलीस मुख्तारचा ताबा घेण्यासाठी रुपनगर जिल्हा कारागृहापाशी पोहोचले. त्यावेळी तिथे सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने २६ मार्च रोजी मुख्तार अन्सारीला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश पंजाब सरकारला दिले. मुख्तार अन्सारीने उत्तर प्रदेशमध्ये स्वतःसाठी बनवलेली बुलेटप्रूफ अँब्युलन्स युपी पोलिसांच्या ताब्यात आली आहे. या अँब्युलंसचे सर्व कागदपत्र बनावट असल्याची माहिती युपी पोलिसांनी दिली आहे. याच केस संदर्भात चौकशीसाठी युपी पोलिसांनी पंजाब सरकारकडे मुख्तार अन्सारीची कस्टडी मागितली होती. परंतु अनेक महिने पंजाब सरकारने ही कस्टडी देण्यास नकार दिला. शेवटी २६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सांगण्यानुसार पंजाब सरकारला मुख्तार अन्सारीचा ताबा युपी पोलिसांना द्यावा लागला. सर्वोच्च न्यायालायने पंजाब सरकारला ८ एप्रिल पर्यंतची मुदत दिली आहे

Exit mobile version