मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना धमकीचा काॅल

धमकीचे आले तीन कॉल . पोलीस तपास सुरु

मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना धमकीचा काॅल

mukesh ambani

रिलायन्स समुहाचे अध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी मिळाली आहे. ही धमकी फाेनवरून दिल्याचे कळतं आहे. इतकेच नाही तर हा धमकीचा काॅल एक दाेन वेळा नाही तर तीन वेळा आहे. त्यामुळे पाेलिसांनी या धमकी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पाेलीसांनी या प्रकरणी मुंबईत एका व्यक्तीला अटक केली असल्याचं समजतं आहे.

या प्रकरणी डीबी मार्ग पाेलीस स्टेशनने तपास सुरू केला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने तीनवेळा फाेन केला. हा फाेन रिलायन्स फाऊंडेशनच्या हरकिशनदास रुग्णालयाच्या डिस्प्ले नंबरवर करण्यात आला. यामध्ये मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला धमकी देण्यात आली आहे.

प्रथमदर्शनी ही व्यक्ती मानसिक रुग्ण असू शकते असं पोलिसांच म्हणणे आहे. पोलिस कॉल रेकॉर्डची तपासणी करणार आहेत आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंटही रेकॉर्ड करणार आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. यापूर्वी अंबानी कुटुंबीयांना धोका निर्माण झाल्यानंतर त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे .

हे ही वाचा:

७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलकडून खास डूडल

बोलण्यातून, वागण्यातून महिलांचा अपमान करू नका

गांधीजी, डॉ. आंबेडकर, सावरकर, सुभाषबाबूंचा त्याग विसरता येणार नाही

गुलामीचा अंश मिटवूया; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिले पाच संकल्प

गेल्या वर्षी घराबाहेर सापडली संशयित कार

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात देशातील सगळ्यात माेठे उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एक संशयित कार सापडली हाेती. या कारमध्ये जिलेटीनच्या २० नळकांड्या सापडल्या हाेत्या. ही संशयित कार आढळून आल्यानंतर खळबळ माजली हाेती, या प्रकरणाची महाराष्ट्र एटीएस तसेच एनआयएनेही तपास केला हाेता.

Exit mobile version