सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी काही दिवसांपूर्वी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल विधान केल्यानंतर त्यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांनी केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत असून पालघर जिल्ह्यातील डॉ. मुहम्मद साद यांनीही रामगिरी महाराजांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. या प्रकरणी आता साद याला अटक करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात पालघर जिल्ह्यातील डॉ. मुहम्मद साद याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रामगिरी महाराजांचा फोटो अपलोड करून ‘सर तन से जुदा’ असे वाक्य लिहित धमकी दिली होती. यानंतर त्यांना हिंदूंचा अपमान आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. संत रामगिरी महाराज यांनी इस्लाम आणि प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर काही आठवड्यांनंतर ही घटना घडली.
हे ही वाचा :
छत्तीसगडमध्ये नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा
गांधी घराण्याचा ‘किम जोंग’ अवतार उघड करणारे ‘भोलानाथ’ गेले…
ऊर्जा निर्मिती करारामुळे ७२ हजाराहून अधिक रोजगार निर्मिती
लालबाग अपघात: जोडीदारासोबत खरेदी करायला गेलेल्या नुपुरची स्वप्ने राहिली अधुरी…
सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी काही दिवसांपूर्वी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटले होते. सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील पांचाळे गावामध्ये प्रवचन देत असताना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राज्यभरात मुस्लीम समुदायाने संताप व्यक्त केला होता. अनेक ठिकाणी निदर्शने करताना ‘सर तन से जुदा’च्या घोषणा ही दिल्या होत्या. पुण्यातही आंदोलनादरम्यान अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. ही बाब उघड झाल्यानंतर ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर, रामगिरी महाराज यांच्यावर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि पुण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.