अश्विनी बिद्रे यांची हत्या हा महाराष्ट्रासाठी एक धक्कादायक प्रकार होता. आता यापेक्षा धक्कादायक प्रकार अजून समोर आलेला आहे. अश्विनी बिद्रे यांच्या हत्याकांडात अटकेत असलेला ज्ञानदेव पाटील याला जामिन मिळवण्यासाठी आता महाविकास आघाडीच्या पक्षांतील एका खासदाराने कंबर कसलेली आहे, असे कळते. अशापद्धतीने खासदार या प्रकरणात आरोपीला मदत करण्याचा आरोप अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी केलेला आहे.
या खासदाराने एका पोलिस निरीक्षकाची बढती करून, गुन्हे शाखेची जबाबदारी देऊ केली आहे. त्यामुळेच या प्रकरणात आता या खासदाराचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अश्विनी बिद्रे यांच्या प्रकरणाची जबाबदारी नवी मुंबई गुन्हे शाखेकडे असल्याने नवी मुंबई गुन्हे शाखेत बदली करण्यात आलेली आहे. असा आरोपच आता बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केला आहे. वर्षाच्या आता खटला निकाली काढण्याचे आदेश असतानाही अजून हा खटला निकाली लागला नाही. तसेच पाटील याचा जामिनाचा प्रयत्न म्हणजे कायदा सुव्यवस्था हातात घेण्यासारखाच कारभार सध्या सुरु आहे.
हे ही वाचा:
मुंबईत ‘माळीण’ची पुनरावृत्ती होणार?
हरित लवाद म्हणते, मुंबईत ८५ ठिकाणी पर्यावरणाचा चुथडा
याआधी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांना या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याने व त्याच्या मुलीने न्यायालयाच्या आवारात बघून घेण्याची धमकी दिल्याची लेखी तक्रार राजू गोरे यांनी न्या. राजेश अस्मर यांच्याकडे केली होती. सदर प्रकरणामध्ये अनेक चढउतार झालेले असून, हे प्रकरण अजूनही निकाली लागलेले नाही. आता सत्ताधारी पक्षातील खासदारच आरोपीला वाचवण्यात पुढाकार घेत असतील तर काय करायचे असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.